Uncategorizedताज्या बातम्या

पेट्रोल पंप देतो म्हणून पंधरा लाखाची फसवणूक

महाराष्ट्रातील जवळपास 300 गुंतवणूकदार फसले

कोट्यावधी रुपये गोळा करून कंपनीने हात वर केले

आर्थिक गुन्हे शाखा पुणे तक्रार दाखल

करमाळा (बारामती झटका)

इंडिझेल या नवीन इंधनाचा शोध कंपनीने लावला असून इतर कंपन्या पेक्षा हे डिझेल चार ते पाच रुपये स्वस्त असून याचे डिझेल पंप वितरक नेमणे आहे. असे असल्याचे जाहिरात महाराष्ट्रातील इंग्रजी वृत्तपत्रासह मराठीतील सर्व अग्रगण्य दैनिकात प्रथम पानावर जाहिरात सदर कंपनीने प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीला बळी पडत अनेकांनी आपले आवेदन पत्र कंपनीकडे सादर करून प्रत्येकी पाच ते पंधरा लाखापर्यंतच्या रकमा कंपनीकडे जमा केल्या. सन 2017 मध्ये हे रकमा गुंतवणूकदारांनी जमा केल्या मात्र, अद्याप कंपनीने कुठलीही कारवाई न करता कोणालाही डिझेल पंप दिलेला नाही. नंतर या सगळ्या गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर यातच फसवणूक झालेल्या करमाळ्यातील नलिनी संजय जाधव (वय 43) या महिलेने पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे लिखित तक्रार दिली आहे.

कंपनीने वृत्तपत्रात मोठ्या मोठ्या जाहिराती देऊन इंडझेल या नावाची आम्ही नवीन इंधन तयार केले आहे. सर्व डिझेल गाड्या चालतात, असा बनाव करून इच्छुक वितरकांना संबंधित डिझेलवर गाड्या चालून दाखवल्या. डिझेल पंपासाठी पंधरा लाख रुपये डिपॉझिट व रस्त्याच्या कडेला जागेची मागणी करण्यात आली. डिझेल पंप मिळणार या प्रेक्षणी महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हजारो लोकांनी लाखो रुपयाची रक्कम कंपनीकडे ऑनलाइन अधिकृतपणे आरटीजीएस करून कंपनीच्या खात्यावर जमा केली. मात्र वारंवार कंपनीच्या अडचणी सांगून गेली पाच वर्षापासून कंपनीने वेळ मारून नेली आहे.

काही जणांनी कंपनीकडे आमच्या रकमा आम्हाला परत द्या, असे केल्यानंतर कंपनीने उडवाउडीचे उत्तर दिले आहे. कोणताही अधिकृत आता माणूस पुढे यायला तयार नाही, कोणी फोन सुद्धा उचलत नाही. ओन इको एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड मधून बिल्डिंग वरळी असा या कंपनीचा पत्ता असून या कंपनीचे संचालक मंडळाचा एकाचाही फोन लागत नाही. या व्यवहारात जवळपास संपूर्ण देशांमधून शंभर कोटी रुपयाची सर्वसामान्य जनाची फसवणूक झाल्याची चर्चा आहे.

बायोडीजेल वर आधारित हा प्रकल्प असल्याचे भासविण्यात आले होते. याबाबत फसवणूक झालेल्या तीनशे गुंतवणूकदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे वेळ घेतली असून गुरुवार दि. 22 डिसेंबर रोजी हे सर्व फसलेले पंपधारक नितीन गडकरी यांना निवेदन देणार आहेत

सौ. नलिनी जाधव – माझ्या मुलाचे भवितव्य उज्वल व्हावे म्हणून मी या डिझेल पंपाचे एजन्सीसाठी अर्ज केला. यासाठी मी कंपनीकडे पंधरा लाख रुपये आरटीजीएस द्वारे भरले आहे. शिवाय एक लाख रुपयाची रक्कम कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर विजय गायकवाड यांच्या वैयक्तिक खात्यावर भरले आहेत. सन २०१७ मध्ये ही रक्कम भरली असून मला कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. मी आता यांना माझी डिपॉझिट परत मागण्यासाठी अर्ज केला असता उलट पक्षी तुम्ही डिझेल पंप वेळेत सुरू केला नाही. अशा आशयाची नोटीस आम्हाला पाठवून उलट कंपनीचेच तुम्ही 70 लाखाचे नुकसान केले असे कंपनी सांगत आहे. यात सर्वसामान्यांची करोडो रुपयांची मोठी फसवणूक झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी मुंबई येथे गुन्हा दाखल करून या कंपनीच्या सर्व संचालकांना अटक करून त्यांच्या मालमत्ता जप्त करून आमच्या गोरगरिबांच्या रकमा आम्हाला परत मिळवून द्याव्यात, अशी मागणी नलिनी जाधव यांनी केली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort