प्रगतशील बागायतदार एकनाथ भिकू देशमुख यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…
माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांना पितृषोक…
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस ६१ फाटा येथील प्रगतशील बागायतदार एकनाथ भिकू देशमुख यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७४ व्या वर्षी गुरुवार दि. ०२/०३/२०२३ रोजी रात्री ११ वा. उपचार घेत असताना दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांचे ते वडील होते.
स्वर्गीय एकनाथ देशमुख यांची साधी राहणी व उच्च विचार सरणी होती त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले. तसेच शेती व्यवसाय करून आपला संसार फुलविलेला होता. त्यांच्यावर शुक्रवार दि. ०३/०३/२०२३ रोजी सकाळी ८.३० वा. माळशिरस ६१ फाटा येथील राहत्या घराशेजारील शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
मृतात्म्यास शांती लाभो व देशमुख परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली…
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng