Uncategorized

प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांच्या ‘मी भारतीय’ कविता संग्रहास शिवानी प्रकाशन मुंबईचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार

सातारा (बारामती झटका)

सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांच्या ‘मी भारतीय’ या कविता संग्रहास शिवानी पब्लिकेशन मुंबई या संस्थेचा शिवानी प्रकाशन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे. सदरची माहिती प्रकाशक संतोष म्हाडेश्वर यांनी दिली. प्रा. डॉ.सुभाष वाघमारे यांच्या ‘मी भारतीय’ या कविता संग्रहाचे प्रकाशन तरूण उत्साही लेखक श्रीरंजन आवटे व रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांचे हस्ते दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतीय संविधान दिनी छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे करण्यात आले होते.

वर्तमानकालीन प्रश्नांचा वेध घेणार्या या कवितासंग्रहास प्रसिध्द साहित्यिक व जेष्ठ पत्रकार संजय आवटे यांची प्रस्तावना लाभलेली असून प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी या कवितासंग्रहातील मूल्य विचारासंबंधी मांडणी केली आहे. या कवितासंग्रहास यापूर्वी श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचा देशजागृती पुरस्कार, अक्षरसागर साहित्य मंच गारगोटी यांचा विशेष ग्रंथ पुरस्कार, माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार मिळालेले असून सदरचा चौथा पुरस्कार या काव्य संग्रहास मिळाला आहे. साहित्यिका डॉ. शीतल मालुसरे, प्रा. डॉ. अलका नाईक, कवी, गझलकार संतोष तावडे व संतोष म्हाडेश्वर यांनी कवितासंग्रहाचे परीक्षण केले. सदर पुरस्काराचे वितरण दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ वाजता पक्षी अभयारण्य, पी.एम.जी.पी. कॉलनी, धारावी बस डेपो समोर, सायन (पश्चिम) मुंबई येथे होणार आहे.

प्रा. वाघमारे यांच्या पहिल्या ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव‘ या कविता संग्रहास एकूण १५ पुरस्कार मिळालेले असून त्यांचे लेखन हे देशात नव्या बदलाची अपेक्षा करणारे आहे. शिवानी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील साहित्यप्रेमी प्राचार्य व प्राध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रा. डॉ. सुभाष वाघमारे हे मूळ, मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर गावचे असून महाराष्ट्रातील पुरोगामी वर्तुळातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

साहित्यवेल प्रकाशनचे सुमित वाघमारे, डॉ. संजयकुमार सरगडे, प्रा. चंद्रकांत जडगे हरिभाऊ पाटील, प्रा. धनंजय गायकवाड, तारुण्यवेध संघटनेचे विशाल पोखरकर, छत्रपती शिवाजी कॉलेजचा स्टाफ, समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते भीमराव मोरे, तुकाराम लोखंडे, शिवाजी वाघमारे, डॉ. गोरख बनसोडे, फर्ग्युसन कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश पवार, ‘भिनवाडा’ कादंबरीचे लेखक बाळासाहेब कांबळे, सचिन अवघडे, प्रा. युवराज खरात, तुषार बोकेफोडे, प्रा. डॉ. आर. ए. कुंभार, सम्यक शाक्यरत्न, प्रा. डॉ. आबासाहेब सरवदे, मळोली, साताऱ्यातील विचारवंत किशोर बेडकिहाळ, अश्वमेध ग्रंथालयाचे अध्यक्ष रविंद्र भारती झुटिंग, डॉ. राजेंद्र माने, मळोली गावातील हितचिंतक ग्रामस्थ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते, लुंबिनी संघ सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील मराठी विभाग, माजी विद्यार्थी संघ, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर, शिक्षक हितकारणी संघटना पुणे तसेच अनेक साहित्यिक इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button