प्रा. फातिमा मुल्ला-इनामदार यांना कॉम्प्यूटर इंजिनियरिंग विषयात पीएच.डी
सातारा (बारामती झटका)
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे मानद सचिव स्व. इस्माईलसाहेब मुल्ला यांची नात व ॲड. दिलावर मुल्लासाहेब यांची कन्या, तसेच मिरजचे प्रख्यात वकील ॲड. नजीर इनामदार यांची सून व ॲड. मोहसीन इनामदार यांची पत्नी प्रा. फातिमा दिलावर मुल्ला-इनामदार यांना भारती अभिमत विद्यापीठाने दि. २ मार्च २०२३ रोजी पीएच.डी पदवी जाहीर केली आहे.
कॉम्प्यूटर इंजिनियरिंग क्षेत्रात ‘प्रेडीक्टींग द हार्ट, हेल्थ स्टेटस बाय आयडेंटिफाय प्रॉमिनंट फॅक्टर्स युजिंग डाटा ॲनालिसिस’ या विषयावर त्यांनी आपले संशोधन मॉडेल भारती विद्यापीठास सादर केले होते. त्यांना कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे-सातारा रोड पुणे येथील प्रा. डॉ. नवीनकुमार जयकुमार यांनी मार्गदर्शन केले. दि. २७ सप्टेंबर २०१७ ला त्यांनी विद्यापीठात पीएच.डी पदवीसाठी नोंदणी केली होती. सदर संशोधनामुळे एखाद्या व्यक्तीच्या ह्रदयाच्या आरोग्याचा अंदाज लावता येणार आहे. ह्र्दयविकाराचे प्रमाण पाहता अतिशय उपयुक्त असे पूर्वानुमान करणारे उपयोजित संशोधन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रा. फातिमा इनामदार या सध्या व्ही.आय.आय.टी. पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून १५ वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्या एकूण संशोधन विषयक कामामुळे आय.एन.एस.सी. चा ‘रिसर्च एक्सलंट अवार्ड’ साठी त्यांची निवड झाली आहे. तसेच SAW असोसिएशन यांनी त्यांच्या अतुलनीय कौशल्य आणि प्रतिभेसाठी ‘ऑरेंज सिटी अवार्ड्स २०२१ ‘ देऊन यापूर्वीच त्यांचा गौरव केला आहे. तसेच दि. ५ सप्टेंबर २०२२ रोजी शिक्षक दिनानिमित ‘ग्लोबल रिसर्च फाऊंडेशन’ कडून त्यांना ‘कृत्रिम बुद्धिमता-सखोल शिक्षण – २०२२’ हा आंतरराष्ट्रीय अकादमिक उत्कृष्टता पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. पीएच.डी संशोधन व साधनांचे संकलन करीत असताना डॉ. बारीज हार्ट अँड सोनोग्राफी क्लिनिक हडपसर चे संचालक डॉ. भूषण अशोक बारी यांनी ह्रदय संदर्भातील विविध प्रकारची माहिती व साधने देऊन त्यांच्या संशोधन कार्यास सहकार्य केले. त्यांनी पीएच.डी पदवी मिळविल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, वकील संघटना, इंजिनियरिंग क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक, त्यांचे नातेवाईक यांचेकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng