बहुजन मराठी पत्रकार संघाची सोलापूर जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर.
सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी अकलूज येथील पत्रकार गणेश जाधव यांची निवड.
अकलूज (बारामती झटका)
बहुजन मराठी पत्रकार संघ हा पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा संघ आहे. या संघाचे संस्थापक अध्यक्ष पंडितजी हणमंते व सुर्यकांत तादलापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्ह्यात बहुजन मराठी पत्रकार संघाची सोलापूर जिल्हा शाखा स्थापन करण्यात आली आहे. या शाखेची नविन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये बहुजन मराठी पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पासाहेब लोखंडे, पुणे यांची निवड, बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी सौ. आशाताई चांदणे कुंभेज (करमाळा) यांची निवड, बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रमिला जाधव सावडी (करमाळा) यांची निवड, बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी बाळासाहेब भिसे, कोर्टी (करमाळा) यांची निवड, बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी अकलूज (माळशिरस) येथील पत्रकार गणेश जाधव यांची निवड, बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा सचिव पदी आबासाहेब झिंजाडे जेऊर यांची निवड, यासह नांदेड जिल्हा अध्यक्षपदी चंद्रभान सूर्यवंशी नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी स्वप्निल गव्हाणे आदी सर्वांच्या निवडी संस्थापक अध्यक्ष पंडितजी हणमंते व सुर्यकांत तादलापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडी करण्यात आल्या असून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन संघटना वाढीसाठी आपण सर्वांनी मोलाचे योगदान देऊन संघटना वाढवावी, असे यावेळी या सर्व पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. व पुढील कार्यास संघाच्या वतीने खूप शुभेच्छा देण्यात आल्या. या निवडीचे समस्त मित्र परिवारासह पत्रकार बांधवांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
अकलूज येथील पत्रकार गणेश लक्ष्मण जाधव हे १९९५ सालापासून पत्रकारिता करीत आहेत. त्यांनी पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पत्रकारिता सुरु केली. पुणे येथे शिक्षण घेत असताना प्रामुख्याने लोकसत्ता, लोकमत, केसरी, प्रभात या दैनिकात काम केले. त्यानंतर अकलूज येथे साप्ताहिक गस्त च्या माध्यमातून काम केले. त्यानंतर काही वर्ष स्वतःचे लोकमानस नावाचे साप्ताहिक सुरु केले. त्यानंतर काही दैनिकात काम केले. सध्या दैनिक जनमतमध्ये अकलूज प्रतिनिधी व दैनिक लोकसह्याद्रीमध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी अनेक विषयावर लेखन केले आहे. तसेच दैनिक जनमत व लोकसह्याद्रीच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न हाताळले आहेत. अनेक प्रश्नांचा पाठपुरावा करून ते प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांनी पत्रकारिता करीत असतानाच सामाजिक, बांधिलकी जोपासत अनेक गोरगरीब नागरिकांची सामाजिक कामे देखील केली आहेत.
गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात देखील अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन, तसेच आवश्यक असलेली इंजेक्शन देखील उपलब्ध करून दिली आहेत.
तसेच संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल च्या माध्यमातून देखील अनेक सामाजिक प्रश्न सोडविले आहेत. अनेक नागरिकांना बातमीच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे.
त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे सांगितले. दरम्यान या निवडीबद्दल सर्व स्तरातील मान्यवरांनीनी गणेश जाधव यांचे अभिनंदन करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.