बाजार समित्यांमध्ये रस्ते, पाणी, निवासस्थान या मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्याऱ्या उमेदवारांना मतदान करा – कुबेर जाधव
सोलापूर (बारामती झटका)
राज्यात बाजार समितीच्या निवडणुका सुरू आहेत. आजवर ज्यांनी बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची लूट केली, तेच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते, संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी करीत आहेत. त्यात काही बाजार समित्या अपवाद आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर डोळे मिटून गप्प बसणारे महाभाग, मत मागायला आल्यावर त्यांना जाब विचारण्याची हिंमत शेतकऱ्यांनी व मतदारांनीच दाखवली पाहिजे.
बाजार समिती कायदा 36 (3) नुसार किमान समर्थन मूल्यपेक्षा कमी भावात शेतमाल खरेदी केल्यास त्या खरेदीदार व्यापाऱ्यावर कारवाई करण्याचा अधिकार बाजार समित्यांना आहे. त्या कायद्यानुसार राज्यात आजवर किती व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई केली ? याचा जाब विचारला गेला पाहिजे. किती बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतमाल साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ? किती बाजार समितीमध्ये (drying yard) शेतमाल वाळवणूक जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ? नाशिवंत शेतमाल साठवणूकसाठी किती बाजार समित्यांनी शीतगृह सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत ? किती बाजार समित्यांनी शेतमाल ग्रेडिंग आणि पॅकिंगच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत ? किती बाजार समित्यांनी धान्य सफाईसाठी चाळण सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत ? किती बाजार समित्यांनी बाजार समितीत शेतकरी निवारा गृह सुविधा किती बाजार समित्यांमध्ये क्रांक्रीटचे रस्ते, थंड पाणी, स्वच्छता ग्रुह, आंघोळीसाठी बाथरुमच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत ?, अशा अनेक शेतकरी हिताच्या व शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत.
बाजार समितीत निवडून दिलेल्या संचालक मंडळाला जाब विचारण्याची हिंमत किती शेतकरी भावांमध्ये आहे. बाजार समिती निवडणुकीत राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांची, आपल्या बगलबच्यांची राजकीय सोय लावण्यासाठी व राजकारण करण्यासाठी राजकीय अड्डा बनविला गेला आहे, हे राजकीय नेते निवडून आले की, ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर बाजार समित्या चालतात, त्यांच्या हिताकडे साफ दुर्लक्ष करून स्वतःचे हीत जपण्यासाठी झटत असतात. प्रत्येक उमेदवाराने निवडून आल्यावर बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी काय सुविधा सोयी उपलब्ध करून देणार, याचा जाहीरनामा प्रसिद्ध करावा. मतदारांनी पण, जातपात, सगे सोयरे न पाहता जे प्रामाणिकपणे शेतकरी हिताचे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत असेल त्यांनाच मतदान करावे. काही राजकीय पक्षांचे ज्येष्ठ, पुत्रप्रेमापोटी आंधळ्या झालेल्या धृतराष्ट्रासारखे काम करत आहेत.
शेतकरी भावांनो आता वेळ आली आहे योग्य निर्णय घेण्याची !!
विचार पुर्वक निर्णय घ्या, ज्यांनी शेतकऱ्यांचे हित पाहीले असेल, त्या उमेदवाराला जरुर मतदान करा, मग तो कोणत्याही पक्षाचा असो व संघटनेचा असो – कुबेर जाधव समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Existe – T – Il un meilleur moyen de localiser rapidement un téléphone portable sans être découvert par celui – Ci? https://www.mycellspy.com/fr/tutorials/how-to-locate-the-other-party-location-by-camera/