Uncategorizedक्रीडाताज्या बातम्याराजकारण

बारामती झटका इफेक्ट…. ताराराणी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनात वगळलेले आमदार राम सातपुते बक्षीस समारंभात अध्यक्ष झाले..

छत्रपती संभाजीराजे महाराज, विजयसिंह मोहिते पाटील, नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण कार्यक्रमात माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते अध्यक्षस्थान भूषविणार.

माळशिरस ( बारामती झटका )

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ताराराणी महिला केसरी 2023 मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि. 5 मे 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता संपन्न झाला. सदरच्या उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांचे पत्रिकेत नाव नसल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झालेली होती. भाजपच्या आमदाराच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या आमदाराला वगळले असल्याने भारतीय जनता पक्षात प्रोटोकॉल पाळला जातो, शिस्तीचा पक्ष मानला जातो. मात्र, मोहिते पाटील परिवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी यांना वगळले असल्याने वरिष्ठ पातळीवर दखल घेतील का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशी बातमी बारामती झटका यांनी प्रसारित केलेली होती. बातमीचा इफेक्ट भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून झालेला असावा. उद्घाटनाच्या कार्यक्रमात वगळलेले भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ताराराणी महिला केसरी 2023 कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 05 मे 2023 तारखेला झाले असून 07 मे 2023 पर्यंत स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत. या कुस्ती स्पर्धेचा समारोप रविवार दि. ७ मे २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि सौ. नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

या निरोप समारंभप्रसंगी प्रमुख उपस्थितीत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे सदस्य आ. रणजितसिंह मोहिते पाटील, बार्शी विधानसभेचे सदस्य आ. राजेंद्र राऊत, स्थायी समिती पुणे महानगरपालिकेचे माजी सभापती गणेश बिडकर, अक्कलकोटचे श्रीमंत मालोजीराजे भोसले, भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा प्रदेश महिला प्रा. कविता म्हेत्रे, साताऱ्याच्या सौ. सोनियाताई जयकुमार गोरे, सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. सौ भारतीताई पोळ, माणदेशी चॅम्पियनचे संस्थापक प्रभात सिन्हा, रयत शिक्षण संस्थेच्या कौन्सिल सदस्या के. जे. एज्युकेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ. हर्षदा देशमुख जाधव हे असणार आहेत.

तसेच यावेळी ‘चौक’ या मराठी सिनेमातील प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे, किरण गायकवाड आणि देवेंद्र अरुण गायकवाड (दया) लेखक आणि दिग्दर्शक आदींचे प्रमुख आकर्षण असणार आहे. तरी मला सम्राट, कुस्तीशौकीन आणि महिला भगिनी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक शिवरत्न कुस्ती केंद्र शंकरनगरचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, ताराराणी महिला कुस्ती केंद्र शंकरनगरच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी मोहिते पाटील, शिवरत्न शिक्षण संस्था शंकरनगरचे सचिव धर्मराज दगडे यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort