बारामती येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारधी परिवर्तन मेळाव्याचे आयोजन
बारामती (बारामती झटका)
बारामती येथे मंगळवार दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारधी परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्याचे आयोजन पारधी समाज राज्य समन्वय व कार्यकारणीद्वारा करण्यात आले होते. यामध्ये बीड, सोलापूर, बारामती, इंदापूर विभागातील कार्यकर्त्यांनी कार्य केले होते. बारामती येथील बर्गे पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या फलटण रोडवरील अधिराज लॉन्स मध्ये हा मेळावा पार पडला.

सदर मेळाव्यास अकलूज विभागातून सामाजिक कार्यकर्ते ॲड. अविनाश काले, घडशी समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचे राज्य संघटक तुकाराम साळुंखे पाटील व आनंद पवार युवक नेते राष्ट्रवादी काँग्रेस यांना आमंत्रित केले गेले होते. सदर कार्यक्रमास प्रा. किसन सर, वंचित नेते उप विभागीय पोलिस अधीक्षक गणेश जी. इंगळे, अनिल बागल गट विकास अधिकारी, बबिता काळे, अर्जुन काळे आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत व संविधान अर्पण पत्रिकेचे वाचन करून अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी व शालेय साहित्याचे वाटप ही करण्यात आले.
बारामती एमआयडीसी उत्पादक संघटनद्वारे मा. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्ताने वितरीत केलेल्या वह्याचे संच विद्यार्थ्यांना सप्रेम भेट देण्यात आले. गुन्हेगारीची कात टाकून मुख्य समाज प्रवाहात येण्यासाठी शिक्षण हाच पर्याय असून पुरोगामी फुले, शाहू, आंबेडकरवादी बनणे हाच एकमेव मार्ग असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
