बार्शीच्या स्त्रीभ्रूणहत्येच्या रॅकेटचे माळशिरसमध्ये कनेक्शन…

बार्शी पोलिसांनी तपासासाठी माळशिरस मधील खाजगी इसम व डॉक्टर अशा दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन गेले आहे.
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील पोलीस स्टेशनमध्ये स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी गुन्हा नोंद झालेला असून बार्शी पोलिसांनी तपासासाठी माळशिरसमधील खाजगी इसम व डॉक्टर अशा दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन गेलेले आहेत. बार्शीच्या स्त्रीभ्रूणहत्येच्या रॅकेटमध्ये माळशिरसचे कनेक्शन असल्याने तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
शासनाने स्त्रीभ्रूणहत्येविषयी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. वारंवार असे प्रकार घडूनसुद्धा अशा गैर गोष्टी घडत आहेत.
सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार यांचे सरकार आहे. विशेष म्हणजे सरकारमधील आरोग्य मंत्री ना. तानाजीराव सावंत आहेत. आरोग्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातील आहेत, त्यामुळे या प्रकरणाकडे कशा पद्धतीने बारकाईने लक्ष देऊन समूळ उच्चाटन करतील का, हे पाहणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार तपासणीचे मशीन सोबत घेऊन डॉक्टर अनेकवेळा अनेक तालुक्यात गेलेले आहेत. तरीसुद्धा आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणा यांना सुगावा कसा लागलेला नाही. हजारो स्त्रीभ्रूण हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. लवकरच सदर प्रकरणाच्या मुळाशी जाऊन जनतेसमोर खुलासा केला जाणार आहे. सध्या पोलीस तपास सुरू असल्याने गोपनीयता राखलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng