बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली मात्र करमाळ्याच्या शेतकऱ्यांचे पैसे का थकवले ?
जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली…
करमाळा (बारामती झटका)
करमाळा तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेले शेतकऱ्यांचे पंचनामे झाली असून जवळपास 49 कोटी रक्कम शासनाने शेतकऱ्यांना अदा करायचे आहे. बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली मात्र, करमाळा तालुक्यातील शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईपासून वंचित आहेत, ही बाब बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
आज ठाणे येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थानी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी भेट घेऊन उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याची बाब लक्षात आणून दिली.
करमाळा तालुक्यातील आठ मंडळातील 30 टक्के पेक्षा पिकाची जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले होते. नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या वृष्टीत केळी, कांदा, तूर, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले होते. याचे पंचनामे करमाळा तहसील कार्यालय मार्फत करण्यात आले होते.
जिरायती पिकांना हेक्टरी सतरा हजार रुपये तर बागायती पिकांना 27 हजार रुपये प्रति हेक्टरी
फळबागांसाठी प्रतिकृती नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली आहे. जवळपास 48 ते 49 कोटी रुपयांची नुकसान भरपाई करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. पण निधी उपलब्ध नसल्यामुळे नुकसान भरपाई अद्याप मिळाली नव्हती. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील नुकसान भरपाई देण्यात आली. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असून दखल घ्यावी, अशी विनंती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महेश चिवटे म्हणाले की, जाणीवपूर्वक करमाळा तालुक्यावर अन्याय केला जात आहे. बार्शी तालुक्याला मदत मिळते व करमाळ्याचे पैसे का दिले जात नाहीत ?
नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या करमाळ्याच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना गळ घातली असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर ही बाब घातली आहे. बार्शीचा निधी वितरित केला
जातो, करमाळ्याचा थांबवला जातो ही बाब गंभीर असून शेतकऱ्यावर अन्याय करणारी आहे. – प्राध्यापक शिवाजीराव सावंत
नुकसान भरपाईसाठी आलेला निधी समप्रमाणात प्रत्येक तालुक्याला देणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक प्रशासकीय अधिकारी एकाच तालुक्याला निधी वाटप करतात हे चुकीचे आहे. करमाळ्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तात्काळ देण्याचे आदेश आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्यामुळे हा प्रश्न आठ दिवसात निकाली लागेल. – महेश चिवटे
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
What a fantastic read! The humor made it even better. For further details, check out: READ MORE. Any thoughts?
An interesting discussion is worth comment.
I think that you ought to write more about this topic,
it may not be a taboo matter but usually people don’t
speak about these issues. To the next! All the best!!!
Hi! Do you know if they make any plugins to help with SEO?
I’m trying to get my website to rank for some targeted keywords but I’m not seeing very good success.
If you know of any please share. Thank you! I saw similar text
here: Eco wool