माळशिरस येथे बुधवारी होम मिनिस्टर कार्यक्रम, विजेत्यास दोन स्कुटीसह बक्षिसांचा खजिना,

क्रांतीनाना मळेगांवकर यांची प्रमुख उपस्थिती
माळशिरस (बारामती झटका)
मकर संक्रांतीचे औचित्य साधून होम मिनिस्टर कार्यक्रम व हळदीकुंकू कार्यक्रम बुधवार दि. २९ जानेवारी २०२५ रोजी सायं. ५ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच तुकाराम देशमुख व माजी नगराध्यक्ष सचिन वावरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे दुसरे वर्ष असून या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण क्रांतीनाना मळेगांवकर हे असणार आहेत. या कार्यक्रमात आकर्षक अशी बक्षिसे असून प्रथम क्रमांकासाठी इलेक्ट्रिक स्कुटी देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर लकी ड्रॉ मधून इलेट्रिक स्कूटी देण्यात येणार आहे. तसेच द्वितीय क्रमांकासाठी वॉशिंग मशीन, तृतीय क्रमांकासाठी एलईडी टीव्ही, चौथ्या क्रमांकासाठी फ्रिज, पाचव्या क्रमांकासाठी पिठाची गिरणी, सहाव्या क्रमांकासाठी पिठाची गिरणी, सातव्या क्रमांकासाठी ओव्हन अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलांसाठी भेटवस्तू देण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम अक्षता मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे अहवान संयोजकांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.