स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी गदेचे पूजन केंद्रीय राज्यमंत्री ना. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शुभहस्ते संपन्न होणार…

६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगरचे आयोजक आ. संग्राम जगताप यांच्याकडे गदा स्वाधीन केली जाणार….
कोथरूड (बारामती झटका)
कुस्ती क्षेत्रातील आश्रयदाते स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी पैलवानांना दिली जाणाऱ्या गदेचे पूजन केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री ना. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शुभहस्ते गदेचे पूजन करून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मंगळवार दि. २८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ०६ वा. ३० मि. अंबर हॉल, मृत्युंजय मंदिरासमोर कोथरूड, पुणे येथे गदा स्वाधीन केली जाणार आहे.

सदरच्या कार्यक्रमास आ. पै. संग्राम जगताप, आ. पै. शंकर मांडेकर, आ. पै. ज्ञानेश्वर कटके, आ. पै. बापूसाहेब पाठारे, पै. दीपकभाऊ मानकर (शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस), पै हनुमंतराव गावडे (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ), पै. विजयआप्पा रेणुसे (सदस्य, पुणे जिल्हा नियोजन समिती), पै. तात्यासाहेब भिंताडे (अध्यक्ष, पुणे राष्ट्रीय तालीम संघ), पै. संदीप आप्पा भोंडवे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, पै. हिंदकेसरी योगेश दोडके (सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ) आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.