मोटेवाडी माळशिरस येथील रेशन दुकानदार पंढरी नामदेव माने यांचे दुःखद निधन…

मोटेवाडी माळशिरस ग्रामपंचायत सदस्य श्री. महादेव पंढरी माने यांना पितृशोक…
माळशिरस (बारामती झटका)
मोटेवाडी, माळशिरस येथील रेशन दुकानदार पंढरी नामदेव माने यांचे वयाच्या 56 व्या वर्षी सोमवार दि. 20/04/2026 रोजी अकलूज येथील सन्मती हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मोटेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री. महादेव माने व प्रगतशील बागायतदार श्री. आप्पासो माने यांचे ते वडील होते. त्यांच्यावर आजच 04 वाजता मोटेवाडी, माळशिरस येथील माने वस्ती येथील राहत्या निवासस्थानाशेजारी शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
पंढरी माने यांच्या दुःखद निधनाने माने परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. माने परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



