ताज्या बातम्यासामाजिक

मोटेवाडी माळशिरस येथील रेशन दुकानदार पंढरी नामदेव माने अनंतात विलीन

मोटेवाडी माळशिरस ग्रामपंचायत सदस्य श्री. महादेव पंढरी माने व श्री. आप्पासो पंढरी माने यांनी मुखाग्नी दिला…

माळशिरस (बारामती झटका)

मोटेवाडी माळशिरस येथील रेशन दुकानदार पंढरी नामदेव माने यांचे वयाच्या 56 व्या वर्षी सोमवार दि. 20/04/2026 रोजी अकलूज येथील सन्मती हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झालेला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मोटेवाडी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य श्री. महादेव माने व प्रगतशील बागायतदार श्री. आप्पासो माने यांनी मुखाग्नी दिला. त्यांच्यावर आजच 04 वाजता मोटेवाडी माळशिरस येथील माने वस्ती येथील राहत्या निवासस्थाना शेजारी शेतामध्ये शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम उद्याच मंगळवार दिनांक 21/04/2026 रोजी सकाळी 07 वाजता होणार आहे..

स्व.पंढरी नामदेव माने यांनी पंधरा वर्ष रेशन दुकान चालवलेले आहे. गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या मुखामध्ये घास कधीही कमी पडू दिला नाही. त्यांचा सौजन्यशील व प्रामाणिक स्वभाव असल्याने जनतेमध्ये कायम त्यांना आदराचे स्थान होते. महादेव व आप्पासो यांनी समाजामध्ये आपल्या वागण्यातून चांगले स्थान निर्माण केलेले आहे.

स्वर्गीय पंढरी माने यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा विशेष करून कुस्ती शौकीन, ग्रामस्थ, मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button