ताज्या बातम्यासामाजिक

अकलूज येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी…

अकलूज शहर भारतीय जनता पार्टी व पदाधिकाऱ्यांनी महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले..

अकलूज (बारामती झटका)

वीरशैव, लिंगायत धर्माचे संस्थापक, थोर तत्त्वचिंतक भगवान महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त अकलूज येथील महात्मा बसवेश्वर चौकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते तात्यासाहेब गुळवे उपस्थित होते..

समता, श्रमप्रतिष्ठा आणि मानवतेचा संदेश देत त्यांनी समाजाला नवी दिशा आणि प्रेरणा देत आहेत अशा थोर महात्म्याला श्री. महादेव कावळे अकलूज शहर अध्यक्ष, तालूका संघटक श्री. निलेश ननवरे, जिल्हा सरचिटणीस श्री. सचिन शिंदे, गट नेते अकलूज नगरपरिषद श्री. राहुल लोढे, नगरसेवक श्री. महेश शिंदे, श्री‌ नागेश गुळवे अकलूज सरचिटणीस, श्री. अमोल माने, श्री. विक्रांत देशमाने, श्री. संतोष वाघमोडे, अकलूज अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष श्री. अमर शेख, श्री. संजय एकतपुरे, श्री. सुहास गायकवाड, श्री. दाजी सदाफुले, श्री. महावीर खंडागळे, श्री. लहूजी कांबळे, श्री. संजय खुडे, श्री. सिद्धार्थ गरीबदास गायकवाड, श्री. शिवचरण खंडागळे, श्री. कुणाल होनमाने, श्री. जतीन वायदंडे, श्री. भैय्या ससाणे, श्री. रोहन लोहार, श्री. गणेश पवार, बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी अभिवादन केले..

महात्मा बसवेश्वरांचे महान कार्य
12व्या शतकातील महान समाजसुधारक, तत्त्वज्ञ, कवी आणि लिंगायत धर्माचे संस्थापक. कर्नाटकातील बागेवाडी येथे जन्म. कल्याणीच्या कलचुरी राजा बिज्जलच्या दरबारात प्रधानमंत्री होते.
समता, बंधुता आणि सामाजिक न्यायावर चर्चा करण्यासाठी त्यांनी ‘अनुभव मंटप’ स्थापन केला. येथे सर्व जाती-धर्माचे, स्त्री-पुरुष एकत्र येऊन चर्चा करत.
कामच पूजा आहे, हा मंत्र दिला. जन्मावरून नव्हे तर कर्मावरून माणसाची योग्यता ठरते, हे ठामपणे सांगितले. अस्पृश्यता, उच्च-नीच भेदभावाला कडाडून विरोध केला.
सामान्य लोकांना समजेल अशा कन्नड भाषेत ‘वचने’ लिहिली. 3000+ वचने आजही उपलब्ध आहेत. फसवून मिळवलेले धन घरात ठेवू नका” असे नैतिक विचार त्यांनी मांडले.

12व्या शतकात अक्कमहादेवीसारख्या स्त्री संतांना प्रोत्साहन दिले. विधवा विवाहाचा पुरस्कार केला. मूर्तिपूजेऐवजी ‘इष्टलिंग’ – स्वतःजवळ बाळगायचे छोटे शिवलिंग – ही संकल्पना दिली. देव देवळात नाही, तो तुमच्यातच आहे, हा विचार रुजवला. श्रमप्रतिष्ठेचा पुरस्कार केला. “काम करणाराच खरा भक्त” असे सांगितले. भिक्षुकी, कर्मकांड यांना विरोध करून कष्टाचे महत्त्व सांगितले.

काम हीच ईश्वरसेवा, दया हाच धर्माचा पाया हे सर्व आपलेच आहेत. या विचारावर भर दिला. आजही लिंगायत समाज आणि संपूर्ण कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागात बसवेश्वरांचे विचार प्रमाण मानले जातात. त्यांची जयंती ‘बसव जयंती’ म्हणून मोठ्या प्रमाणात साजरी होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button