ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक भगवानराव थोरात उर्फ नाना यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन….

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक भगवानराव (नाना) मारुतराव थोरात यांचे वयाच्या ७२ वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवार दि. 19/04/2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन पुतने व नातवंडे असा परिवार आहे. वै. कृष्णकांत (भाऊ) मारूतराव थोरात यांचे ते लहान बंधू होते. त्यांचा
अंत्यविधी रात्री ८ वाजता पुणे पंढरपूर रोड वैकुंठ स्मशानभूमी माळशिरस येथे होणार आहे.

भगवानराव थोरात उर्फ नाना यांनी माळशिरस पंचक्रोशीमध्ये आपल्या सौजन्यशील व नम्रताशील वागण्याने आपली ओळख निर्माण केलेली होती. किराणा दुकानाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायामध्ये अग्रेसर होते. थोरात परिवार यांनी माळशिरसमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू करून कित्येक वर्ष हरिनामाचा गजर केलेला आहे.

नानांच्या दुःखद निधनाने थोरात परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. थोरात परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व नानांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button