सोलापूर जिल्ह्याचे निष्क्रिय माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यापेक्षा विद्यमान पालकमंत्री यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या…

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळेच वळण, दोघात तिसरा आता सगळंच विसरा…, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे…
पंढरपूर (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लाभलेले होते. सोलापूर जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजना व जिल्ह्यातील मूलभूत सुविधा व विकास होईल अशी अपेक्षा होती. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील जनतेचा भ्रमनिरास होऊन सोलापूर जिल्ह्याचे निष्क्रिय माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अशी जनतेची धारणा झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महायुतीच्या सरकारमधील ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर सोलापूरच्या जनतेच्या विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून अपेक्षा उंचावलेल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भोवती आजपर्यंत राजकारण फिरलेले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या राजकीय मुत्सुद्दी व राजकारणातील चाणक्य यांच्या राजकीय राजनीतीने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळेच वळण लागणार आहे. दोघात तिसरा आता सगळेच विसरा…, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांची पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते. महायुतीच्या नेते व कार्यकर्ते यांच्याबरोबर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मनातील पालकमंत्री झालेले आहेत. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या मनातील पालकमंत्री झालेले असल्याने सोलापूर जिल्ह्याच्या सहद्दीपासून नातेपुते ते सोलापूर शहरापर्यंत जनतेने जयकुमार गोरे यांचे उत्साहपूर्ण वातावरणात जंगी स्वागत केलेले होते. सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये भविष्यात जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य पद्धतीने नियोजन तयार केलेले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण काशी संबोधले जाणारे श्रीक्षेत्र पंढरपूर असल्याने पंढरपूर तीर्थक्षेत्राचा वेगळा विकास आराखडा तयार होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. गावगाड्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्या संलग्न असणारे ग्रामविकास खाते पालकमंत्री यांच्याकडे असल्याने तळागाळातील कार्यकर्त्याच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. गोरगरीब व सर्वसामान्य जनतेपर्यंत व्यक्तिगत लाभ पोहोचविण्याकरता जिल्ह्यातील प्रशासन सतर्क राहणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असताना काही ठोस कार्य करता आले नाही. सोलापूर लोकसभा व माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले होते, तरीसुद्धा मतदारसंघात अनेक प्रलंबित योजनेची उकल झालेली नाही. पंढरपूर तालुक्याने सोलापूर लोकसभा मतदार संघ व माढा लोकसभा मतदार संघ दोन्हीही मतदार संघातील सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते पाटील लोकप्रतिनिधींचा अनुभव घेतला असल्याने पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व करणारे सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते पाटील यांचे केंद्रात व राज्यात सरकार असताना काहीही करू शकले नाही. त्यांचे राजकीय वारसदार सध्या लोकप्रतिनिधी असले तरीसुद्धा केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार असल्याने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ म्हणतील तसं…, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.