ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

“चर्चा तर होणारच”, आ. उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यावर गांजा केस मधील आरोपी जामीन होताच हजर, उलट सुलट चर्चेला उधाण….

अकलूज पोलीस स्टेशन हद्दीतील महाळुंग येथे 129 किलो गांजा कारवाईतील आरोपी जामीन होताच आमदार उत्तमराव जानकर यांच्या पाठीमागे हजर…

अकलूज (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक श्री. नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. साळुंखे व त्यांच्या पथकाने महाळुंग येथील 129 किलो गांजा कारवाई केलेली होती. सदरच्या कारवाईत सहा आरोपी होते. तीन आरोपींना दहा महिन्यानंतर जामीन झालेला आहे. आनंद भिसे व अफताब मुलाणी यांनी आमदार उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगला निवासस्थानी भेट घेऊन पाठीमागे उभे राहिलेले आहेत. सदरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चा तर होणारच… आमदार उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यावर गांजा केसमधील आरोपी जामीन होताच हजर झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे.

आ. उत्तमराव जानकर यांनी माळशिरस तालुक्यात गांजा, गुटखा, मटका, दारू याविषयी विधानसभेत आवाज उठवलेला होता. त्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट झालेले होते. अनेक ठिकाणी कार्यवाही केलेल्या होत्या. त्यामध्ये अकलूज पोलीस स्टेशन हद्दीतील महाळुंग येथे गांजा तस्करी करणारे सहा आरोपी यांच्यावर कार्यवाही केलेली होती. दहा महिने कारागृहात असणारे आरोपी त्यामधील तीन आरोपींना जामीन झाल्यानंतर लगेचच दोन आरोपींनी उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगला निवासस्थानी भेट घेतल्याने तालुक्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

आ. उत्तमराव जानकर गांजा, दारू, गुटखा, मटका बंद करण्याचा हेतू आहे का, गांजावाले पाठीमागे उभा करून कोणता संदेश द्यावयाचा आहे, याची उलट सुलट चर्चा तालुक्यात सुरू आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button