Uncategorized

बाळाला सहा महिन्यांपर्यंत आईचं दुधचं का पाजावं ?

सोलापूर (बारामती झटका) लोकमत साभार

आईच्या दुधात प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच जीवनसत्वे, क्षार आणि रोगप्रतिबंधक घटक असतात. म्हणूनच आईच्या दुधाची तुलना इतर कुठल्याही दुधाशी होणार नाही. आईचे दूध पचायला हलके असते. बाळाच्या वाढीस जरूर असणारे सर्व पोषक घटक योग्य त्या प्रमाणात असतात. आईच्या दुधाचे तापमान बाळास योग्य असते‌ बाळासाठी पहिले सहा महिने आईचं दूधच निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.

बाळाला दूध कधी पाजावे?
बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्या तासातच स्तनपान करावे. फक्त सिजेरियन झाले असल्यास आईची भूल उतरल्यावर स्तनपान करावे. बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्या तासात केलेले स्तनपान म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण आहे. काही माता तीन दिवस बाळाला पाजतच नाही तेही अगदी चुकीचे आहे.

आईच्या दुधाचे कोणते फायदे आहेत ?
आईचे दूध हाच बाळाचा सर्वात उत्तम आहार आहे. आईचे दूध निर्जंतुक असते. आईच्या दुधात प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच जीवनसत्वे, क्षार आणि रोगप्रतिबंधक घटक असतात. मुख्य फायदा म्हणजे स्तनपानामुळे आई व मुलात शारीरिक आणि भावनिक नाते निर्माण होते. आईने रोज स्वच्छ आंघोळ करून स्तनपान वेळेवर करणे गरजेचे आहे.

दूध पिऊन झाल्यावर मुले कधी कधी उलटी का करतात ?
बऱ्याचवेळा दूध पिताना हवा ही पोटात जाते आणि त्यामुळे ढेकरबरोबर उलटीही होते. त्याकरिता दूध पाजून झाल्यावर बाळाला खांद्यावर घेऊन थोपटावे म्हणजे ढेकराच्या स्वरूपात हवा निघून जाईल व बाळाला उलटी होणार नाही. जर उलटीमधून दूध किंवा दह्यासारखा पदार्थ पडत असल्यास काळजी करू नये. पण, बाळ अचानकपणे उलटी करू लागले व उलटी हिरवी किंवा पिवळी असल्यास, ताप असल्यास मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बाळाला किती वेळा पाजावे ?
बाळास त्याच्या भुकेप्रमाणे पाजावे. आईला भरपूर दूध येत असेल तर बाळ पोटभर दूध ठ
पिऊन झोपते. स्तनात उरलेले दूध काढून टाकावे नाहीतर स्तनात गाठ येऊन सूज येते व त्यामुळे बाळाला दूध पाजण्यास अडथळा येतो. प्रत्येक स्तनातून दहा मिनिटे दूध पाजावे. बाळाची शांत झोप हे पोटभर दूध पिऊन झाल्याचे लक्षण समजावे.

बाळाला किती दिवस अंगावर पाजावे ?
बाळाला जास्तीत जास्त दिवस अंगावर पाजावे पहिले सहा महिने तर आईचे दूध हेच बाळाचे अन्न व पाणी असते‌. पण निदान बाळ दीड ते दोन वर्षांचे होईपर्यंत त्याला अंगावर पाजावे. अंगावर पाजणाऱ्या आईने स्वतःच्या आहाराची काळजी घेतली पाहिजे‌. तिच्या जेवणात पालेभाज्या, दूध, फळे ,मोड आलेली कडधान्य या गोष्टी असाव्यात. बाळ आनंदी असेल, त्याला शी व्यवस्थित होत असेल व झोपही चांगली येत असेल तर त्याला पुरेसं दूध मिळते असे समजावे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button