भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांची राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री व भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) नवी दिल्ली यांच्या शिफारशीने ही निवड करण्यात आली आहे. सदरची निवड ही आगामी तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे.
श्री. शंकरराव वाघमारे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची सामाजिक, राजकीय कारकिर्द सुरू झाली. भाजपाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून १० वर्ष पक्ष संघटनेत काम केले. नंतर त्यांना दोनवेळा मोहोळ तालुका अध्यक्ष म्हणून १९९५ ते १९९९ या काळात संधी मिळाली. तसेच ३ वेळा जिल्हा सरचिटणीस, तीन वेळा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, राज्य परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा खनिज प्रतिष्ठान, संजय गांधी निराधार समिती सदस्य, सौंदणे (ता. मोहोळ) ग्रामपंचायत सरपंच, माळी महासंघाचे किसान आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आदी पदावर काम केले आहे. ते सतत ३८ वर्षे भाजपामध्ये सक्रिय काम करीत आहेत.पक्षाने अनेकदा त्यांच्यावर अनेक निवडणुकीची जबाबदारी दिली होती. २००८ व २०१४ विधानपरिषद, २००९ ची अक्कलकोट विधानसभा, २०१४ ची सोलापूर लोकसभा आदी वेळी त्यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे.
तसेच त्यांनी सामुदायिक विवाह, रक्तदान शिबिर, अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी वाघमारे यांचे अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल भाजपचे आ. विजय मालक देशमुख, आ. सुभाषबापू देशमुख, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, माजी खासदार ॲड. शरद बनसोडे, किसान आघाडीचे प्रदेश अध्यक्ष वासुदेवनाना काळे, भाजपा किसान आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस शंभुसिंगजी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.त्यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील डाळिंब उत्पादक शेतकरी आणि प्रक्रिया उत्पादन करणाऱे शेतकरी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Insightful and well-written! Your points are thought-provoking. For those wanting to learn more about this topic, here’s a great resource: FIND OUT MORE. Interested in hearing everyone’s perspective!