भाजपचे नेते के. के. पाटील यांची प्रचाराच्या भाषणात शुभारंभालाच जीभ घसरली…
राज्यकर्ते यांनी महिलांचा नामोल्लेख शक्यतो टाळावा, आणि व्यंगावर, मयत माणसांवर बोलू नये.
अकलूज ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधी पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजपचे सोलापूर जिल्हा सह प्रभारी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भाजपचे नेते के. के. पाटील यांची प्रचाराच्या भाषणात शुभारंभालाच जीभ घसरली असल्याची राजकीय वर्तुळात व विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू आहे. राज्यकर्त्यांनी महिलांचा नामोल्लेख शक्यतो टाळावा आणि व्यंगावर किंवा मयत माणसांवर बोलू नये असाही सूर निघत आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिवर्तन विकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पॅनल प्रमुख फत्तेसिंह माने पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रचाराची सभा आयोजित केलेली होती. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना सत्ताधारी गटावर टीका करीत असताना धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मातोश्रींचा नामोल्लेख करण्याची चूक केलेली आहे. जर के. के. पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या परिवारातील सदस्य असे म्हणायला पाहिजे होते. परंतु, थेट नामोल्लेख केलेला असल्याने जीभ घसरली असल्याची चर्चा सुरू आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवरत्नवरील सत्ताधारी मोहिते पाटील गट व विरोधी गटात फत्तेसिंह माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर, भाजपचे के. के. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित बोरकर, शिवसेनेचे गणेश इंगळे अशा अनेक राजकीय पक्ष व संघटना एकत्र येऊन समविचारी आघाडी करून निवडणूक रणधुमाळी सुरू आहे.
सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या प्रचारावेळी विरोधकांना चिलटं, डास अशी उपमा देऊन धनाजी संताजी तुम्हाला पूरून उरतील, अशी टीका केलेली होती. त्यावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी नाना पाटेकर यांचा डायलॉग सांगितला, ‘एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है’, असे सांगून यामधील एक मच्छर सुद्धा तुमच्या संपूर्ण पॅनलला हिजडा बनवेल असे सांगितले होते. यामध्ये त्यांनी दिलेल्या टीकेला उत्तर झाले. मात्र के. के. पाटील यांनी वजन काट्याचा कशाप्रकारे भ्रष्टाचार चालतो हे सांगत असताना धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मातोश्रींचे नाव घेतलेले होते. त्यावेळेस व्यासपीठावर फत्तेसिंह माने पाटील, पद्मजादेवी मोहिते पाटील, हिंदुराव माने पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, उत्तमराव जानकर, सोपान काका नारनवर, मच्छिंद्र आबा ठवरे, तुकाराम देशमुख, ज्योतीताई माने पाटील, यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ नेते, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना सुद्धा हे वाक्य खटकले असणार आहे. टीका टिपणी करीत असताना राज्यकर्त्यांनी शक्यतो महिलाचा नामोल्लेख टाळावा. एखाद्याच्या व्यंगावर, मयत माणसांवर बोलू नये असाही सूर राजकीय विश्लेषक व राजकारणातील जुनी जाणती मंडळी यांच्यामधून येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
MyCellSpy is a powerful app for remote real – Time monitoring of Android phones. https://www.mycellspy.com/tutorials/how-to-install-spy-app-to-track-someone-phone-for-free/
It’s very interesting! If you need help, look here: hitman agency
Great read! The clarity and depth of your explanation are commendable. For further reading, here’s a useful resource: EXPLORE FURTHER. Let’s discuss!