ताज्या बातम्याराजकारण

भाजपच्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या संयोजकपदी सुनील काटकर यांची नियुक्ती

सातारा (बारामती झटका)

भारतीय जनता पार्टीच्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या संयोजक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती सुनील काटकर यांची नियुक्ती केल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

गेली अनेक वर्षे सुनील काटकर हे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे विश्वासू समर्थक म्हणून कार्यरत आहेत. ग्रामविकास, सहकार याचा गाढा अभ्यास असलेल्या सुनील काटकर यांचे संघटन कौशल्यही उत्कृष्ट आहे. उदयनराजेंची सावली म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे. सुनील काटकर यांनी यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापतीपद भूषवले आहे. सभापतीपदाच्या कारकिर्दीत सातारा जिल्ह्यात उदयनराजेंच्या माध्यमातून विकासाचा झंजावात निर्माण करण्यात काटकर यांना यश आले होते. उदयनराजे यांच्या सातारा लोकसभा मतदारसंघात संघटन कौशल्याची जबाबदारी काटकर यांच्याकडेच असते. काटकर यांचे संघटन कौशल्य, बेरजेचे राजकारण करण्याची हातोटी व प्रभावी जनसंपर्क यामुळे भाजपने त्यांच्यावर सातारा लोकसभा मतदारसंघाची संयोजकपदाची जबाबदारी सोपवली आहे. लोकसभा मतदारसंघाचे निवडणुक संयोजक म्हणून काटकर काम पाहणार आहेत. याशिवाय भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती केली असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मुंबईत केली. बावनकुळे यांच्या हस्ते काटकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रदेश कार्यकारिणी व भाजपच्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती होताच राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी काटकर यांचे अभिनंदन केले.

यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सुशांत निंबाळकर, संग्राम बर्गे, काका धुमाळ, पंकज चव्हाण, बाळासाहेब खरात, शैलेश संकपाळ, अमोल सणस, विनीत पाटील आदी उपस्थित होते. काटकर यांच्या नियुक्तीबद्दल राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह ना. निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, आ. शिवेंद्रराजे भोसले, नरेंद्र पाटील, धैर्यशील कदम, संघटनमंत्री मकरंद देशपांडे, लोकसभा प्रभारी अतुलबाबा भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर, प्रदेश सचिव भरतनाना पाटील, माजी आमदार दिलीप येळगावकर, माजी आमदार मदनदादा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, मनोजदादा घोरपडे, रामकृष्ण वेताळ, डॉ. प्रियाताई शिंदे, महिला आघाडी अध्यक्ष सुरभिताई भोसले, युवक अध्यक्ष निलेश नलवडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button