Uncategorized

भाजप बुद्रुक नेते व कार्यकर्ते यांच्या तोंडाला कुलूप, कोणत्या वरिष्ठ नेत्याकडे कुलपाची चावी… #अकलुज कृषी उत्पन्न बाजार समिती #मोहिते पाटील समर्थक #भाजप

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप बुद्रुक गटाचे नेते व कार्यकर्ते यांचे मौन असल्याने उलट सुलट चर्चा सुरू…

माळशिरस (बारामती झटका)

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप बुद्रुक गटाच्या नेते व कार्यकर्ते यांचे निवडणुकीतील भूमिकेविषयी मौन असल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे. भाजप बुद्रुक नेते व कार्यकर्ते यांच्या तोंडाला कुलूप असल्याने कोणत्या वरिष्ठ नेत्याकडे या कुलपाची चावी आहे, असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली आहे. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी मोहिते पाटील गट भाजपमध्ये असल्याने निवडणुकीस सामोरे जात आहे. मात्र, भाजपमध्येच बुद्रुक गट असणारा पारंपारिक मोहिते पाटील यांचे विरोधक म्हणून समजले जाणारे नेते व कार्यकर्ते भाजप बुद्रुक गटात कार्यरत आहेत. सत्ताधारी मोहिते पाटील गट भाजपच्या बुद्रुक गटाला निवडणुकीत सामावून घेऊन संचालक पदाच्या जागा देतील, असा आशावाद आहे का ?,वरिष्ठ नेत्यांकडून भाजप बुद्रुकच्या नेते व कार्यकर्ते यांच्या तोंडाला कुलूप लावून मौन धरण्यास सांगितले आहे का ?, असाही प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चिला जात आहे. कारण भाजप बुद्रुकमधील नेते व कार्यकर्ते सत्ताधारी मोहिते पाटील गटावर टीका टिप्पणी करीत असताना हरभरे फोडल्यासारखे कडाडत असत मात्र, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत मौन का आहे?, याचे तालुक्यातील जनतेला आश्चर्य वाटत आहे.

सत्ताधारी मोहिते पाटील गट बुद्रुक भाजपच्या नेते व कार्यकर्ते यांच्यावर विश्वास टाकतील का ?, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दि. ३ एप्रिल २०२३ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तोपर्यंत वरिष्ठ नेते कुलपाची चावी देऊन भाजप बुद्रुक गटातील नेते व कार्यकर्ते मौन सोडतील का ? याची माळशिरस तालुक्यातील जनतेला उत्सुकता लागून राहिलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button