भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा
भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी माळशिरस तालुक्यातील वर्णी लागण्याची शक्यता..
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी आपल्या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. सदरचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांनी मंजूर करून भाजपचे सोलापूर शहराध्यक्ष विक्रांत देशमुख यांच्याकडे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविलेली आहे. रिक्त झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी माळशिरस तालुक्यातील सोलापूर जिल्ह्याचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील व भाजपचे सोलापूर जिल्हा प्रभारी के. के. पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी येण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी, राजाभाऊ राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

सांगोला तालुक्यातील जवळा येथील श्रीकांत आप्पासाहेब देशमुख यांच्याकडे सोलापूर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली होती. त्यांनी सक्षमपणे जबाबदारी पार पडलेली आहे. काही महिन्यानंतर तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण होणार होता, या कालावधीत त्यांनी सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष वाढीसाठी भरीव काम केलेले आहे. पक्षाची ताकद निश्चितपणे जिल्ह्यात वाढलेली आहे. वरिष्ठ नेते मंडळी श्रीकांतदादा देशमुख यांच्या पक्ष कार्यावर समाधानी होती. मात्र, त्यांनी अचानक राजीनामा देण्याचे कारण पत्रामध्ये देऊन राजीनामा दिलेला आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना दिलेल्या पत्रामध्ये एका महिलेकडून माझे आणि ट्रॅपमध्ये अडकवून चारित्र्य हनन झालेबाबत खुलासा केलेला आहे.
श्रीमती निर्मला शिवाजी यादव नामक महिलेलेने ग्रीन टीमध्ये गुंगीचे औषध घालून माझ्याबरोबर आक्षेप जनक व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये बनवून माझ्या चरित्र्य हननाचा प्रयत्न केलेला आहे. सदर कृत्यामध्ये माझ्या राजकीय विरोधकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. सदर महिलेने यापूर्वी देखील अनेक राजकीय नेत्यांना व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याची ठोस माहिती मिळालेली आहे.
या महिलेच्या विरोधात मी ओशिवारा अंधेरी मुंबई पोलीस स्टेशनमध्ये आणि हनी ट्रॅपिंग व खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचा तपास सुरू आहे.
सदर महिलेने सूडबुद्धीने व अन्य हेतूने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत मी माझ्या भाजप पक्षाला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून जिल्हाध्यक्ष या पदापासून दूर राहणे उचित समजतो. गेली दोन वर्ष पक्षासाठी रात्रीचा दिवस करून जिल्ह्यात पक्ष संघटना अनेक राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून बळकट केलेली आहे.

आत्तापर्यंत 86 गुन्हे अंगावर घेतलेले आहे. या मानहानीकारक परिस्थितीतून मी लवकरच बाहेर पडून पुन्हा जोमाने पक्ष कार्य चालू ठेवीन, तोपर्यंत मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणे योग्य समजतो. यापुढेही आपली साथ राहावी तसेच मार्गदर्शन व सहकार्य मिळावे ही नम्र विनंती. अशा आशयाच्या पत्राची प्रत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना देऊन संघटन मंत्री मकरंद देशपांडे व माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng