भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी धैर्यशीलदादा कदम यांची निवड करण्यात आली..
फलटण (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी श्री. धैर्यशीलदादा कदम यांची नियुक्ती केलेली आहे.
भारतीय जनता पार्टीचे नूतन सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा सन्मान माढा लोकसभा प्रभारी माजी सनदी अधिकारी श्री. विश्वासराव भोसले, भाजपा युवा मोर्चा प्रमुख श्री. सुशांतराजे निंबाळकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष बजरंगनाना गावडे, फलटण विधानसभा प्रमुख सचिनदादा कांबळे पाटील, फलटण तालुका सरचिटणीस श्री. संतोष सावंत आदी मान्यवरांनी सन्मान करून भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng