मंत्री तानाजीराव सावंत यांचे नेतृत्वाखाली आदिनाथ पूर्णगत वैभव प्राप्त करेल, असा विश्वास
आदिनाथला मदत करणार – तात्या मस्कर
करमाळा (बारामती झटका)
आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा स्वाभिमान असून ते सहकाराचे मंदिर आहे. आदिनाथ कारखाना पूर्वपदावर येऊन त्याला गत वैभव प्राप्त करावे, यासाठी प्रशासक म्हणून नेमलेल्या महेश चिवटे व संजय गुटाळ यांनी सक्षमपणे काम करावे, असे आव्हान आदिनाथचे माजी चेअरमन तात्या मस्कर यांनी केले. आदिनाथच्या प्रशासक पदी निवड झाल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा सत्कार आदिनाथ साखर कारखान्याचे माजी चेअरमन तात्या मस्कर, बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे, समाजाचे अध्यक्ष कलीम काजी यांनी केला.
यावेळी बोलताना तात्या मस्कर म्हणाले की, मी आदिनाथ कारखान्याचा चेअरमन असताना सहा लाख टन उसाचे गाळप झाले होते. आता आगामी काळातसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली इथेनॉल प्रकल्पाची उभारणी करावी, अशा सूचना केली.
यावेळी बागल गटाचे नेते विलासराव घुमरे यांनी आदिनाथ कारखान्याला कामकाज करताना आवश्यक असेल तेथे मला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करेन, असे आश्वासन दिले. तसेच आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ कारखाना पुन्हा गत वैभव प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng