मला कांहीं सांगायचं आहे. – ॲड.अविनाश काले.
अकलूज ( बारामती झटका)
आज दिसणारी जीवघेणी आणि मानसिक घुसमट करणारी वास्तवता पाहून माझ्या सारख्या माणसाचे हृदय पिळवटून निघते ,
माझा जन्म समाजकारण करणाऱ्या घरात झाला , वडील रीपाई खोब्रागडे गटाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष होते , पण त्यांचे मैत्री चे सबंध सर्व जाती धर्मातील व्यक्तीशी होते , मी अशी माणसं पाहिली जी जाती पलीकडे जाऊन एक मेका ला मदत करत होती ,
माझ्या वडिलांनी बांधकाम कॉन्ट्रॅक्टर चां असलेला व्यवसाय सोडून पूर्ण वेळ राजकारणाला वाहून घेतले , त्या काळी राजकारण हा आजच्या सारखा व्यावसायिक धंदा नव्हता ,
जिथे अन्याय अत्याचार होत असतील तिथे त्या पीडितांची जात धर्म गरीब श्रीमंत असा भेद न करता बाजू घेऊन त्यांना न्याय मिळवून देणे हेच मुख्य काम त्यांचे असायचे , ते स्व खुशीने जे मानधन देतील ते घेऊन त्यात गुजराण करायची हे फार कठीण होते ,
या काळात अचानक मदतीची गरज लागायची , माझे वडील त्यांच्या सहकारी मित्रा कडे मला पाठवायचे , त्या काळी मोबाईल नसत , ज्यात कै ऍड गणपत राव क्षीरसागर ज्यांना आम्ही भाऊ म्हणायचो त्यांच्या कडे जाऊन शे दोनशे रुपये आणायचे ,
भाऊ ही शेती करत आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न पिठाची चक्की , तांदूळ मिल , आणि भुईमूग शेंग भरडणी , या आधारे असायचे ,
घरातील कोणाला ही न कळू देता भाऊ मदत करायचे , ते लिंगायत समाजाचे होते ,
आमच्या घरा समोर , मोतीलाल होरा यांचे घर , ते ही शेतकरी , पापरी तालुका मोहोळ येथे त्यांची सत्तर चे आसपास जमीन , त्यांची मुले व आम्ही मित्र ,,,
सतीश व्होरा हे आ रणजित सिंह मोहिते पाटील यांचे अतिशय जवळचे मित्र , आ रणजित दादा यांचे भाषेत सतीश म्हणाला की सूर्य पश्चिम दिशेला उगवतो तर मी म्हणणार तो तिकडेच उगवतो , ,
त्यांची थोरली बहीण आणि आम्ही सर्व लहान मंडळी त्यांचे घरात कॅरम खेळायचो , गाण्याची भेंडी म्हणायचो
आमच्या घराच्या डाव्या बाजूस उत्तरे कडे अनंत राव खंडागळे , आणि दक्षिण बाजूस सदाशिव राव रास्ते यांचे कुटुंब , आणि त्यांची मुले माझी मित्र , जे आज हयात नाहीत , अनिल खंडागळे आणि माजी सरपंच नंदकुमार
रास्ते ,,, हे दोन्ही परिवार मातंग समाजाचे
आणि आम्ही नव बौद्ध ,
आमच्या घराचे लाईन ला मराठा , माळी , तर समोर जैन , परीट , राजपूत लोहार ,गवंडी अश्या सर्व जाती धर्माचे लोक
आमच्या डोक्यात कधी जातीयवाद , धर्म वाद असा शिरलाच नाही , किंवा फार मोठा जातीय भेदभाव वाट्याला आलाच नाही
मी चौथीत असताना कदम गुरुजी मला शिक्षक म्हणून होते ते करमाळा येथील , त्यांची पत्नी ही शिक्षका होत्या , आणि त्यांना बदली हवी होती , त्यांचे आणि आमचे सबंध हे त्यांच्या मृत्यू नंतर ही राहिले होते , ते करमाळा येथे किल्ला विभागात राहत व त्यांचा मुलगा इंजिनियर झालेला होता ,
सातवीत माने गुरुजी होते ते ही करमाळा येथील व आज जेथे संघाचे सचिन शिंदे राहतात त्याच घरात ते भाडोत्री राहत होते ,
इयत्ता 10वित असताना गणित आणि इंग्रजी शिकवणारे वसंत राव कुलकर्णी हे हांगे बिल्डिंग मध्ये राहत , ते हयात होते तो पर्यंत आम्हाला सवलतीत मिळणाऱ्या साखरेचे कार्ड त्यांच्या कडेच असायचे ,
पुढे मोठा झालो , आ रणजित सिंह मोहिते पाटील यांचा सहकारी म्हणून काम केले , चळवळी करत असताना , प्रसाद जोगळेकर यांचे समवेत राहिलो , भाग्यवंत दादा नायकुडे , , अमित गदादे , ऍड आ आर जी रुपनवर (आप्पा)शिरीष फडे , बाळासाहेब वावरे , , शंकर राव शिंदे , किती आणि कोण कोणती नावे घेऊ ,,,,?
आमच्या बांधा लगत असलेले माने हे कोंडबावी गावाचे , आणि पंचवटी येथील संभाजी माने हे आमचे मित्र , हे सर्व “मराठा ” आमचे श्री निवास कदम पाटील हे ही “मराठा”
पण आमच्यात कधी जातीभेद आडवा आला नाही या भावना ही कधी मनात उमटल्या नाहीत
पक्षीय मतभेद होतील , राजकीय अवसर नाकारला म्हणून मोहिते पाटील यांचे वर आम्ही दोषा रोप करू ही पण जेंव्हा माझ्या मुलांनी आंतर जातीय विवाह केला तेंव्हा
आदरणीय विजय दादा म्हणाले कांहीं अडचण असेल तर सांगा , मी स्वतः मुलीच्या घरच्यांना सांगतो ,
धैर्यशील मोहिते पाटील , यांच्या सामजिक वर्तुळा कडे लक्ष टाकले तरी यात अनेक जण नवबौध्द समाजाचे दिसतील
त्यांचे माझे सबंध हे होतेच , यात कटुता असण्याचे ही फारसे कारण नाही , जे मतभेद असतील किंवा इर्षे चां भाग असेल तर तो हाच आहे की राजकीय किंवा सामाजिक जीवनात मला ही आश्रित म्हणून राहण्याची सवय नाही , यातून कांहीं मतभेद झाले नाही असे नाही , पण मुंबई ला गेल्या नंतर त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करत असताना आमच्या साठी स्वतः चे हाताने बनवलेले पोहे , किंवा विजय शुगर मिल येथे , आम्ही दोघे आहोत मोठा जेवणाचा डबा घेऊन या अस सांगणे , हे मी कस विसरणार?
कै लोकनेते प्रतापसिंह जी मोहिते पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ रात्री म्हसवड वरून सभा आटोपून , आदरणीय पद्मजा देवी प्रताप सिंह मोहिते पाटील यांच्या समवेत आलो तेंव्हा आईसाहेब म्हणाल्या काले , जेवण घेतल्या शिवाय जाऊ नका , किचन मध्ये जाऊन मी माझ्या हाताने मला पाहिजे ते घेतले(अर्थात दूध ) जे माझ्या आवडीचे आहे , हे कसं विसरणार?
आदरणीय पप्पा साहेब असताना त्या घरातील सर्व महिला सदस्या समवेत अगदी घरातील सदस्य बनून वावरलो इतका विश्वास मी ही सार्वजनिक जीवनात कायम ठेवला आणि समोरून ही त्याचा सन्मान राखला गेला ,,, हे वास्तव आहे ,
ऍड पी ई दादा कुलकर्णी , ऍड मिलिंद कुलकर्णी , ऍड मिरासदार (द मा मिरासदार यांचे पुतणे ) माझे सहकारी किशोर इनामदार , अकलूज चे अण्णा कुलकर्णी , आमचे शिरीष फडे , अशी भली मोठी यादी समोर येईल , ही माणसे मी जात व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून कमवली , ती या गढूळ वातावरणाने गमावून काय साध्य करणार आहोत?
उत्तर प्रदेशात मा कांशीराम जी यांनी राजकीय प्रयोग केला होता , जाती आहेत , हे वास्तव आहे , म्हणून जात अस्मिता येणे हे ही स्वाभाविक आहे , तो संघर्ष टाळून त्यांनी नारा दिला होता , “जिसकी जितनी लोक संख्या भारी ,,,, उसकी उतनी भागीदारी” यातून सर्व समावेशक राजकारण पुढे आले ,
त्यांनी राजकारणात धर्मचिकित्सा आणली नाही , आज लोकशाहीत भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला त्यांच्या श्रध्दा जपण्याचे , त्या नुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे , ते मान्य करून सुखनैव राहता येईल ,,,
पण नाहक चिकित्सा आमची पाठ सोडायला तयार नाहीत , त्यातून अनेकांच्या धार्मिक भावनाची चिकित्सा करून नेमका सामाजिक , राजकीय फायदा काय? याचा गांभीर्याने विचार न केल्या मुळे हे नसलेले विकतचे दुखणे समाजाच्या बोकांडी लादलेले आहे ,
मी बौद्ध मताचे पालन करू नये असे कोणीच म्हणत नाही , उलट जेंव्हा आम्ही श्रामनेर बनून अकलूज मधून फेरी काढली होती तेंव्हा ऍड दिलीप फडे ज्येष्ठ विधीज्ञ यांनी इतक्या चांगल्या प्रकारे संस्कार असलेली धार्मिक मिरवणूक आम्ही पहिल्यांदा पाहिली असे फोन करून मला कळवले
समाज चांगल्या व्यक्तीची , चांगल्या गुणाची कदर करतो , कौतुक ही करतो ही बाब लक्षात घ्या , जात धर्म न पाहता तो मदत ही करतो , हा मानवी स्वभाव आहे , सगळे मिळून मिसळून सर्व समाजाशी एकरूप होऊन राहतात तसे नवबौध्द समाजाने ही राहणे आत्मसात केले पाहिजे ,
सोशल मीडियाचा वापर जबाबदारी ने करा , चांगले निर्माण करण्या साठी करा , राजकीय संघर्ष ही वेगळी बाब आहे , सारे लोक जाणतात की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रेमी आहे ,मी त्या पक्षाच्या विचार धारेचा प्रचार करेन , या पक्षा सोबत उत्तम राव जानकर आहेत म्हणून मी त्यांचे समवेत काम करत असेन किंवा व्यक्तिगत स्नेह बंधनातून काम करत असेन ,, म्हणून माझे पक्षीय मत भेद राहतील , पण व्यक्ती म्हणून मी कोणाचा तिरस्कार करावा इतकी घसरण माझी स्वतः ची मी का करून घ्यावी?
लोकांनी माझा तिरस्कार करू नये ,,,, माझ्या धम्माचा तिरस्कार करू नये , या साठी मी आदर्श स्थापित करणे हे माझे काम आहे , ते बाहेरून होत नाही , आपल्या दृढ नैतिक आचरणाने आपण आदरास ठरू,,,,, आदरास पात्र की तिरस्कार करण्यास पात्र हे आपले सार्वजनिक आचरण ठरवते एवढेच मला सांगायचे आहे
आणि हा कुणाला उपदेश देणारा लेख नाही ,,,, हे माझे व्यक्तिगत मनोगत आणि अनुभव आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng