Uncategorizedताज्या बातम्या

महारांच्या शौर्याच्या इतिहासाला कलंकित करून त्यांच्या गळ्यात गाडगे मडके अडकवू नका…

महार शुर होते, शुर आहेत व शुर राहतीलॲड. अविनाश टी. काले

शिवरायांच्या स्वराज्यातील किल्ला जिंकणाऱ्या महार पाटलांची स्फूर्तिदायक कथा…

अकलूज (बारामती झटका)

कोणत्याही समाजाला त्यांच्या स्फूर्तिदायी इतिहासाची गरज असते. ती समाज म्हणून आपला इतिहास हा गौरवशाली होता व आपली मान ताठ होती, हे दर्शवणारा असावा असे वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी हे जाणले. त्यांनी पराभुतांचा इतिहास सांगितला नाही, लाचार लोकांचा आदर्श समाजासमोर कधीच ठेवला नाही, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी क्षूद्र पूर्वी कोण होते ? हा ग्रंथ लिहून ते लढवय्ये होते, अशी मांडणी केली. नाग किंवा नाक हे राजे होते हे सांगितलं. ब्रिटिश काळात आणि त्याही अगोदर लष्करात सेवा बजावणारे वीर महार समाजात होते, हे त्यांनी दर्शवून दिलेच. परंतु, कोरेगाव भीमा येथील अभूतपूर्व युद्धात ५०० महार लढवय्ये पेशवाईला भिडले आणि बलाढ्य शत्रूचा विनाश त्यांनी घडवून आणला, हा इतिहास ही त्यांनी पुढे आणला.

इ. स. १६८९ मध्ये वडुज येथे शंभू राजे यांचा औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने शिरच्छेद केला व त्यांच्या देहाची विटंबना करण्यासाठी शरीराचे तुकडे करून फेकले असता ते तेथील गोविंद महार यांनी शिवून त्यांचेवर अंत्यसंस्कार करून आपली राज्याप्रतीची निष्ठा दर्शवून दिली. पण इतिहासाचे विकृती करण करून “महार समाज हा शत्रूशी सख्य करून स्वराज्य विरोधी सक्रिय असतो” अशी विकृत मांडणी एका बाजूने केली जाते.
तर डॉ‌. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाती अंत लढाईचे उद्दात्तीकरण करण्याच्या नादात अर्धवट लोकांनी , गायक व कलावंत, यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार समाजावर आहेत, ते होते. म्हणून महारांच्या गळ्यात गाडगे आणि कंबरेला असलेला झाडू बाजूस निघाला, अशी मांडणी करण्यास सुरुवात केली. आपण आपल्या पूर्वजांच्या शौर्याच्या इतिहासाचे विकृतीकरण करत आहोत आणि समाजाच्या मेंदूत हिनत्वाची भावना निर्माण करत आहोत हे ही त्यांच्या गावी नसते. अशा लोकांचा मला प्रचंड राग येतो‌.

एका अर्थाने हेच लोक समाजाला लाचार आणि भित्रे व मानसिक दृष्ट्या पंगू बनवत आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. ते लोक ही बाब विसरतात की, ब्रिटिशांशी पत्रव्यवहार करून महार समाजाची लष्करभरती करा, असे सांगणारे गोपाळ बुवा लवंगकर होते‌‌. दस्तुरखुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते. त्यांच्या गळ्यात गाडगे असते तर ते सुभेदार झाले असते का ?
पेशवाई विरोधात युद्ध लढणारे महार त्यांचे गळ्यात गाडगे आणि कंबरेला झाडू असता तर तो घेऊन ते युद्ध लढले असते का ?

मनुस्मृतीकालीन धर्म व्यवस्था व त्यातील लेखी आज्ञा काहीही असल्या तरी समस्त ब्राम्हण वर्ग हा पक्षपाती व अन्याय कर्ता असल्याचे ही इतिहासात दिसत नाही. म्हणून कोणत्याही एकतर्फी खलनायक ठरवणाऱ्या इतिहास लेखनास पूर्वग्रह दूषित मानण्याची वृत्ती आपणांस प्राप्त झालीच पाहिजे. त्यासाठी हा इतिहास एकदा वाचावाच लागेल.
“मराठेशाही” नावाची इतिहास मालिका इतिहास संशोधक प्रवीणजी भोसले यांनी यूट्यूबवर चालू केलेली आहे. तो इतिहास ते मौखिक पद्धतीने मांडतात व मधून मधून त्यासाठीचे पुरावे किंवा संदर्भ ते देत जातात. असा मौखिक इतिहास ऐकताना अतिशय सुखद वाटते पण, त्याचे तपशील नंतर आठवत नाहीत. आणि त्यामुळे तोच इतिहास पुन्हा कोणाला तरी सांगताना तपशील निसटून जाण्याचा धोका असतो व त्यामुळे कोणताही इतिहास हा मौखिक न ठेवता तो लेखाच्या स्वरूपात मांडला जावा, असे माझे व्यक्तिगत मत आहे, म्हणून हा खटाटोप मी केलेला आहे.

अर्थात याचे सर्व श्रेय हे प्रवीणजी भोसले यांचेच आहे
आणि “धन्याचा तो माल मी तो हमाल भार वाही” या संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्या ओवीचे रूपाने मी विनम्रतेने सांगत आहे.
इ.स. १६८९ साली शंभूराजे यांची हत्या क्रूरपणे औरंगजेबाने केल्यानंतर महाराष्ट्रातील बहुतेक सर्व किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले.

शंभूराजे यांचे बंधू छत्रपती राजाराम महाराज यांनी सर्व बळ एकवटून मुघली सत्ता विरोधातील संघर्ष चालू ठेवला. मराठा समाजासह १२ बलुतेदार व १८ अलुतेदार यांना औरंगजेबाचे शासन हे परकीय शासन आहे, याची जाणीव होती. म्हणून स्वराज्य रक्षणाचे उद्दात भावनेतून सर्व जातीतील शुर योध्यांनी स्वतःच्या मरणाची तयारी ठेऊन या युध्दात सक्रिय झाले.
पुणे-सातारा हायवे चे डाव्या व उजव्या बाजूस जे किल्ले आहेत, त्यात पांडव गड, चंदन वंदन गड, नांद गिरी, वैराट गड, अजिंक्य तारा, सज्जन गड असे गड व किल्ले आहेत. यातील वैराट गडाचा इतिहास आणि नागेवाडी गावच्या पाटीलकीचा वाद व त्याच्या निवाड्याचा इतिहास पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ यांनी भरवलेल्या ७ व्या संमेलनाचे निमित्ताने प्रकाशित केलेल्या पुस्तकात आहे. आणि नागेवाडीगावच्या नागनाथ महाजुर पाटील (महार) यांनी त्यांच्या पाटीलकीचे वादा संबंधी लिहून दिलेल्या हकिगतीचा मजकूर व त्याचा निवाडा याचा लेखी पुरावा

वाईचे इतिहास संशोधक कै. श‌. ना. जोशी यांना वाईच्या देशपांडे यांच्या घरातून मिळाला असल्याचे नमूद आहे. इ.स. १६७४ मार्गशीर्ष शु. ४ से १७५३ डिसेंबर ता. ९ गुरव पिलाजी गोले यांची संख्या करून वतनाशी भांडतो, तो खोटा त्यास व वतनाशी अर्थाअर्थी संबंध नाही. त्यावरून देशमुख व देशपांडे समस्त गोत व समाकुल पांढर व भोंदर गाव यांचे साक्षीनीशी हजर करून दिल्हा बित” वाईचे देशमुख सूर्याजी पिसाळ आणि दत्ताजी पिसाळ यांचेसह वाईचे पाटील, शेटे व चौधरी अशा महत्त्वाच्या वतनदारांच्या सह्या आहेत. हा वाद तीन वेळा उद्भवला. १७०० सालचे काही वर्ष अगोदर १७०० साली आणि त्यानंतर १७५३ साली त्याचा अंतिम निवाडा झाला व छत्रपतींचे पणतू सातारकर रामराजे यांनी वतन पत्र करून दिले.
त्याची हकीगत पुढीलप्रमाणे,

वाई परिसरातील बावधन जवळच्या नागेवाडी गावची परंपरागत पाटीलकी ही नागनाथ महार यांची होती. ( आम्ही पाटील अजून जिवंत आहोत व महार मांगाच्या हातात गाव चालवायला दिलेले नाही अशी भाषा लोकशाहीत बोलणाऱ्यासाठी, ही बाब महत्वाची, ॲड. अविनाश टी काले) नागेवाडीचा देव “नागवर सिध्द” त्याची पूजा अर्चा करण्यासाठी दांडेकर व गोडोली या गावातील मोरोजी व चिंतामणी या गुरवांना नागेवाडी येथे आणून स्थाईक केले. त्यासंबंधी तक्रार देताना नागनाथ महार यांचे पुत्र महजुर सेटी यांनी लिहिले

“गुरवांनी नागनाथ महार पाटलांचे मारेचुरे केले. (महजुर सेटी बिन नागनाथ महार) मौजे नागेवाडी स||मुऱ्हे प ||मजकूर यांसी लिहून दिला. महुजर येसाजे तवा हुजुर येऊन जाहीर केले की, मौजे नागेवाडी येथील कदम पाटील की, आपली मिरास आपले वाडवडील चालवीत आले. देवाचे पूजेस गुरव धाडे परकर येक व गौडालिकर येसे गावात आणून ठेविले त्यांनी रहिवास होताच आपले वडिलांचे मारे चूरे करून करून मीरास घेतली आपण महार दूर उभा राहून असे गुरव जवळ जडला लाच लुचपती देऊन मिरासिस जडला कदम बुणादी आहे साहेबी आपणास हाती धरून पांढरी वरी बसवून असे पत्र नाग नाक महार यांचे पुत्र महाजुर सेटी यांनी या अत्याचार व दंडेलशाही चे विरोधात स्वराज्याचे प्रतिनिधी परशुराम त्र्यबंक यांचे कडे केली
प्रतिनिधी यांनी गुरवाना बोलावणे धाडले पण गुरव आले नाहीत मग प्रतिनिधींनी शेजारच्या गावच्या
शिवधरे पाटलांना बोलावले या पाटलांनी नागेवाडीच्या पाटीलकी चे वतन महराचेच आहे अशी साक्ष सत्याला वाड वडीलांची शपथ घेऊन दिली

गुरवानी या निवाड्या विरोधात राजाराम महाराज यांच्या कडे तक्रार केली , महाराजांनी देशपांडे यांना बोलावून चौकशी केली व त्यात देशपांडे यांनी ही ” ही पाटीलकी” पूर्वापार महारांचीच आहे असे सांगितले , त्या तंट्या चां निकाल लावण्याची जबाबदारी परशुराम त्र्यबंक यांनाच दिली व कायमचा सोक्षमोक्ष लावण्या साठी “धार दिव्य ” करण्याचे ठरवले
पुरावे अपुरे असल्यास हे धार दिव्य करावे लागत असे व त्यात दैवी शक्ती वर विश्वास ठेवला जात असे त्या द्वारे सत्याची पारख केली जात असे

रवा दिव्य, नदी दिव्य , ज्योती दिव्य अशी विविध दिव्य असत ,
हाताला झाडाची पाने बांधून त्यावर ठराविक काळासाठी लोखंडी लालबुंद गोळा धरणे , , पाण्यात दीर्घ काळ उभे राहणे , दिव्याची ज्योत सतत पेटती ठेवणे , हे करताना ते करणाऱ्यास कांहीं ही त्रास झाला तर तो खोटा असे ठरवले जात असे
(नाग नाक यांचे वतन पत्र गहाळ झाल्याने लेखी पुरावा राहिला नसल्यानेच गुर्वानी हे धाडस केले होते
या प्रकरणात प्रतिनिधी यांनी प्रचलित धार दिव्य न सांगता
मोघलांच्या ताब्यात असलेला वैराट गड जिंकून स्वराज्यात आणण्याचे धार दिव्य सांगितले
हे कार्य इतके अवघड होते की , शंभू राजे यांच्या मृत्यू नंतर महाराष्ट्रातील बहुतेक किल्ले मुघलांच्या ताब्यात आले होते 1698साली राजाराम महाराज जिंजी वरून महाराष्ट्रात आल्या नंतर लाखो ची फौज घेऊन स्वतः औरंगजेब याने चाल केली होती 1689ला औरंगजेब याने अंजिक्य तारा ला वेढा घालून तो जिंकला होता
वाई ला मुघलांचे लष्करी ठाणे बनवले होते हमिदुउदिन बहादुर याने सर्जा गड म्हणजेच वैराट गड (वाई पासून 6मैल )चाल केली ,

दोन दिवस मराठे लढले व शेवटी त्यांनी किल्ला सोडला
13डिसेंबर 1699ला नाहर खान याचा मुलगा मुहम्मद इब्राहिम याची किल्लेदार म्हणून औरंगजेबाने नेमणूक केली व मनसब वाढवून कोदाळ (आजचे गोंदवले) परगणा जहागिरी , सरंजाम म्हणून देण्यात आली , त्याचे सोबत 150 हशम (सैनिक)दोन बाण दार , दोन शक्का (पाणी भरणारे)व दोन गोलंदाज (तोफा डागणारे ) देण्यात यावे अशी आज्ञा केली
तोफा त दारू भरून त्या वर दगडी गोळा ठेवत व तोफेला बत्ती दिल्या नंतर , त्याच्या आवाजाने कानाचे पडदे फाटू नयेत म्हणून बत्ती देणारा मागील पाण्याच्या हौदात स्वतः ला बुडवून घेत असे , तो हौद भरण्याचे काम हे शक्क करत
औरंगजेब किती क्रूर राजा होता हे इतिहासा ला माहीत आहे , त्याचेशी वैर करणे म्हणजे सगळे कुटुंब आणि खानदान हाल हाल करून मारले जाण्याचा धोका होता आणि तो कांहीं फार लांब नव्हता अश्या परिस्थितीत गुरवानी ते आव्हान सोडून दिले पण महाजुर यांनी ते स्वीकारले , दिडशे शत्रूंना ते भिडले आणि त्यांचेशी युद्ध खेळून त्यांना कापून काढून वैराट गड स्वराज्याला जोडला

हे शौर्य महार समाजात आहे ,
गावात देवाची पूजा करण्यासाठी सोवळ्यात जाताना ब्राम्हण मंडळी कुणालाच स्पर्श करत नसत ,
अगदी पारधी समाजात रेडा मारला जात असताना त्यांचा पुजारी रक्ताने माखलेला असताना ही तो इतरांना शिवून घेत नाही , , त्यातून या कल्पना विकसित झाल्या
मृत गाई बैल , यांची विल्हेवाट लावण्याचे गाव गाड्यातील काम , त्याचे कातडे काढून ते ढोर या समाजा कडे देणे , व त्यांनी कातडी वर प्रक्रिया करणे ते कातडे घेऊन त्याची मोट , पायातील वहान बनवणे , चाबकाची वादी , पाण्याची पखाल , इत्यादी , त्या मुळे देव कार्य करताना त्यांचा स्पर्श तत्कालीन व्यवस्थेने देवाचे पावित्र्य जपण्याच्या भूमिकेतून जपले होते इतकाच याचा अर्थ आहे ,
त्यांचे गळ्यात गाडगे व कंबरेला झाडू च असते तर , अश्या पाटीलकी त्यांचे कडे कधीच नसत्या ,
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हेच दर्शवून दिले व “नाक “ही उपाधी दुसरी तिसरी नसून ती नाग वंशीय लोकांना अर्थात महार समाजा ला दिलेली आहे , हेच सांगितले , शंभू राजे यांचे अंगरक्षक रायाप्पा महार हे होते ,
नागेवाडी गावात 13व्या व 14व्या शतकाती ल वीरगळ आहेत , तेथील सिध्द नाग मंदिरात , नाग नाक यांची दगडी मूर्ती आहे ज्याचे हातात तलवार आहे व ती महाजुर पाटील यांची आहे , गावदेवी काळूबाई यांचे मंदिरा समोर असलेली समाधी त्यांचीच असावी असा निष्कर्ष प्रवीण भोसले यांनी काढलेला आहे
हा थोर वारसा व लढवय्ये पण समाजाचे असताना , ते झाकून ठेवण्याचे पाप आपण का करत आहोत?
समाज लाचार होता , खुरडत जगत होता , त्याचे गळ्यात मडके व पाठीला खराटे बांधलेले होते अस ज्यांना वाटते , ते लाचार असतील , त्यांचे बाप जादे लाचार व दीन वाणे असतील ,
आम्ही नाही , माझे आजोबा बिदर विभागाचे जात पंचायत प्रमुख होते , माझे वडील रीप पक्ष खोब्रागडे गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष होते , त्यांना काठी लाठी येत होती व ते लढवय्ये होते , अनेक मोर्च्ये त्यांनी काढले , आणीबाणी ला विरोध केला होता ,
तो वारसा मानणारे आम्ही आहोत
नागेवाडी गावात आज ही त्यांचे पूर्वज आहेत
बाबा बनसोडे पाटील , कधी जमलं तर या गावाला भेट द्या , वैराट गडाला भेट द्या , त्या गडाच्या भिंती सांगतील महार समाजाचा पराक्रम , स्वराज्यासाठी चे त्यांचे लढणे , आणि इतिहास वाचला तर हे ही समजेल की स्वराज्याचे प्रतिनिधी ब्राम्हण असले तरी ही त्यांनी न्याय केला , महार म्हणून पक्षपात केला नाही ,
न्याय , साक्ष , जाती आधारित नाही तर वृत्ती आधारित आहे ,

ॲड. अविनाश टी. काले डॉ. आंबेडकर चौक, अकलूज,ता. माळशिरस, जि. सोलापूर,पिन कोड ४१३१०१मो‌. ९९६०१७८२१३

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort