Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्याराजकारण

महाराष्ट्रात राज्य सरकार अस्तित्वात आहे का ?, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांचा सवाल…

मुंबई (बारामती झटका)

महाराष्ट्रात १०० दिवसांपूर्वी चमत्कार घडला. बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे इडी सरकार अस्तित्वात आले. नव्याचे नऊ दिवस आता संपतील, मग संपतील, सरकारी कामे गतीने सुरू होतील, याची सामान्य जनता वाट पहात होती. अशातच राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला व सामान्य शेतकरी अडचणीत आला. या अतिवृष्टीमुळे सुमारे २२ लाख हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीन, कापूस, खरीपाची पिके, इ. पिकांचा समावेश आहे. त्यामुळे एकीकडे अन्नदाता बळीराजा शेतकरीच अडचणीत असताना दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री मात्र बंडखोरांच्या मतदारसंघात दौरे करण्यात व्यस्त होते, विमान थांबवून मी कसा भारी, अशा वल्गना करत फिरत होते.

त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादा पवार हे शेतकऱ्याच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी करत होते. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी वेळोवेळी मागणी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी केली होती. मात्र या इडी सरकारने हेक्टरी केवळ १३ हजार ६०० रुपये इतकी तुटपुंजी मदत जाहीर करून राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस सतत दिल्ली वाऱ्या करत होते, पण महाशक्तीकडून राज्यासाठी विशेष पॅकेज आणण्यात शिंदे – फडणवीस सरकार सपशेल फेल ठरले, टोटल फेल. केंद्र सरकारच्या पथकाने अवकाळी व पूरस्थितीची पाहणी करून देखील केंद्राने राज्यासाठी विशेष पॅकेज दिले नाही.

हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे, असं मुख्यमंत्री शिंदे जाहीर भाषणातून सांगतायत. पण सर्व आघाड्यांवर या बेकायदेशीर इडी सरकारने राज्यातील १३ कोटी सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. राज्यातील अनेक महत्वाचे प्रश्न ऐरणीवर असताना हे इडी सरकार फक्त विरोधी पक्षावर कुरघोडी करण्यात आघाडीवर राहिले आहे.

त्यामुळे आता प्रश्न पडतोय, राज्यात नेमकं कोण सत्तेत आहे ? ५० खोके घेऊन ओके झालेले मिंध्ये सरकार ? ये बिक गई है गौरमिंट !! शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा तीव्र निषेध राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ता रविकांत वरपे यांनी केला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort