Uncategorizedक्रीडाताज्या बातम्यामनोरंजन

महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर यांच्यात माळशिरस तालुक्यात कण्हेर येथे लढत होणार.

पं.स. सदस्य कण्हेरचे माजी सरपंच गौतमआबा माने पाटील मित्र मंडळ आणि समस्त ग्रामस्थ कण्हेर यांच्यावतीने कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन

कण्हेर (बारामती झटका)

माळशिरस पंचायत समितीचे सदस्य कण्हेर गावचे माजी सरपंच गौतम आबामाने पाटील मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ कण्हेर ता. माळशिरस यांच्यावतीने सालाबादप्रमाणे नागपंचमी निमित्त मंगळवार दि. २ ऑगस्ट २०२२ रोजी दु. १ वा. निकाली कुस्त्यांचे भव्य जंगी मैदान आयोजित केले आहे. सदरचे कुस्ती मैदान माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने यांच्या मार्गदर्शनात व नियोजनामध्ये मैदान संपन्न होणार आहे.

माळशिरस तालुक्यामध्ये महाराष्ट्र केसरी व उपमहाराष्ट्र केसरी मल्लांचे भव्य जंगी मैदान कण्हेर येथे संपन्न होत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचे खासबाग, सांगलीचे कुंडलचे मैदान या मैदानानंतर सर्वात मोठे मैदान गौतमआबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कण्हेर येथे संपन्न होत आहे. या भव्य जंगी कुस्ती मैदानात उद्घाटनाची कुस्ती पै. सुरज माने वस्ताद महादेव ठवरे यांचा पठ्ठा व पै. अभिषेक पांढरे वस्ताद शंकर काळे यांचा पठ्ठा आणि पै. वीर माने मांडकी वस्ताद तानाजी रणवरे यांचा पठ्ठा व पै. संग्राम पिसे वस्ताद अप्पासो वाघमोडे यांचा पठ्ठा यांच्यामध्ये उद्घाटनाची कुस्ती संपन्न होणार आहे. या कुस्ती मैदानामध्ये अनेक मल्लांच्या कुस्त्या होणार आहेत.

त्यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील, इंडियन आर्मी विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर गंगावेश तालमीचे वस्ताद विश्वास हरगुले यांचा पठ्ठा यांच्यात २ लाख ५१ हजार रुपयांमध्ये लढत होणार आहे. सदरची कुस्ती कै. सखाराम निवृत्ती माने विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व श्रीमंत मोतीराव कुंभार यांच्या स्मरणार्थ श्री. सुभाष एकनाथ माने माजी सरपंच कण्हेर व श्री. सुरेश श्रीमंत कुंभार शिवशंभो वीट उद्योग दहिवडी कण्हेर यांच्यातर्फे होणार आहे. तसेच द्वितीय क्रमांकाची कुस्ती पै. वेताळ शेळके पुणे, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पठ्ठा विरुध्द पै. माऊली कोकाटे पुणे, वस्ताद गणेश दांगट पुणे यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रु. १,५१,००० रुपयांमध्ये लढत होणार आहे. सदरची कुस्ती श्री. बाजीराव महादेव माने-पाटील मा.वि.का.सो. चेअरमन आणि श्री. किरण लालासाहेब माने (डबल सरपंच) मांडकी उद्योजक पुणे यांच्यातर्फे होणार आहे. तृतीय क्रमांकाची कुस्ती पै. वैभव माने कण्हेर, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पठ्ठा विरुध्द पै. संग्राम पाटील इंडियन आर्मी यांच्यात इनाम रु. १ लाख रुपयांमध्ये लढत होणार आहे. सदरची कुस्ती श्री. मोहित (शेठ) जाधव उद्योगपती नातेपुते आणि श्री. संतोष आबा उद्योजक नातेपुते यांच्यातर्फे होणार आहे. चतुर्थ क्रमांकाची कुस्ती पै. गणेश कुंकुले म्हसवड वस्ताद रवींद्र पाटील शाहूपुरी तालीम कोल्हापूर यांचा पठ्ठा विरुध्द पै. संतोष जगताप वस्ताद नामदेव नाना वाघमारे शिवनेरी तालीम अकलूज यांचा पठ्ठ यांच्यात इनाम रु. १ लाख रुपयांमध्ये लढत होणार आहे. सदरची कुस्ती कै. दादासो धोंडीबा ठवरे व कै. अंकुश म्हाकू देवकते यांच्या स्मरणार्थ श्री. दीपक दादासो ठवरे आणि श्री. बापूराव म्हाकू देवकते यांच्यातर्फे होणार आहे. पाच नंबरची कुस्ती पै. सुरज माने वस्ताद महादेव ठवरे यांचा पठ्ठा विरुध्द पै. अभिषेक पांढरे वस्ताद शंकर काळे यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. सदरची कुस्ती श्री. अशोक दडस मा. सरपंच ग्रामपंचायत बांगर्डे यांच्यातर्फे होणार आहे. तसेच पै. वीर माने मांडकी, वस्ताद तानाजी रणनवरे यांचा पठ्ठा विरुद्ध पै. संग्राम पिसे वस्ताद आप्पासो वाघमोडे यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. सदरची लढत तानाजी रणनवरे सर उपसरपंच ग्रामपंचायत मांडकी यांच्यातर्फे होणार आहे.

पै. शुभम माने कण्हेर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पठ्ठा विरुध्द पै. तेजस गायकवाड वस्ताद नामदेव नाना वाघमारे शिवनेरी तालीम अकलूज यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रु. ५१ हजार रुपयांमध्ये लढत होणार आहे. सदरची कुस्ती श्री. नवनाथ आबा रूपनवर मा. सरपंच ग्रामपंचायत चाकाटी आणि श्री. गोपाल शेठ शेंडगे मा. सरपंच ग्रामपंचायत भांब यांच्यातर्फे होणार आहे. पै. पवन सरगर कण्हेर स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा विरुध्द पै. महादेव माने म्हसवड वस्ताद महालिंग खांडेकर यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रु. ५१ हजार रुपयांमध्ये लढत होणार आहे. सदरची कुस्ती श्री. धनाजी काळे मा. सरपंच ग्रामपंचायत भांब आणि श्री. नाथा आबा लवटे सरपंच ग्रामपंचायत मेडद यांच्यातर्फे होणार आहे. पै. सुरज मुंढे कोल्हापूर वस्ताद जालिंदर आबा मुंडे कोल्हापूर यांचा पठ्ठा विरुध्द पै. मनीष रायते पुणे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पठ्ठा यांच्यात इनाम ५१ हजार रुपयांमध्ये लढत होणार आहे. सदरची कुस्ती श्री बळीराम आप्पा चेअरमन इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्था आणि श्री. रवींद्र शेठ फरांदे उद्योगपती पुणे यांच्यातर्फे होणार आहे. पै. आप्पा वळकुंदे माळशिरस वस्ताद कै. बाजीराव देशमुख यांचा पठ्ठा विरुध्द पै. गोविंद दीडवाघ म्हसवड वस्ताद रवींद्र पाटील शाहूपुरी तालीम कोल्हापूर यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रु. ४१ हजार रुपयांमध्ये लढत होणार आहे. सदरची कुस्ती श्री. पांडुरंग तात्या पिसे ग्रामपंचायत सदस्य गोरडवाडी आणि श्री.. खंडू तात्या कळसूले मा.वि.का.सो. चेअरमन गोरडवाडी यांच्यातर्फे होणार आहे. पै. धुळदेव पांढरे भांब वस्ताद शंकर काळे नातेपुते यांचा पठ्ठा विरुध्द पै. प्रवीण भोसले अकलूज वस्ताद नामदेव नाना वाघमारे शिवनेरी तालीम अकलूज यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रु. ४१ हजार रुपयांमध्ये लढत होणार आहे. सदरची कुस्ती कै. मारुती दादा कुंभार यांच्या स्मरणार्थ श्री. दगडू दादा कुंभार यांच्यातर्फे होणार आहे. पै. समाधान गोरड गोरडवाडी वस्ताद आप्पासो वाघमोडे यांचा पठ्ठा विरुध्द पै. तुषार सरक लोणंद, वस्ताद नवनाथ शेंडगे यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रु. ३१ हजार रुपयांमध्ये लढत होणार आहे. सदरची कुस्ती कै. निवृत्ती शंकर गोरड माजी सरपंच ग्रामपंचायत गोरडवाडी यांच्या स्मरणार्थ श्री. विजय निवृत्ती गोरड सरपंच गोरडवाडी यांच्यातर्फे होणार आहे. पै. आप्पा देशमुख माळशिरस वस्ताद कै. बाजीराव देशमुख यांचा पठ्ठा विरुध्द पै. ऋतुराज मदने वस्ताद महादेव ठवरे यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रु. २५ हजार रुपयांमध्ये लढत होणार आहे. सदरची कुस्ती श्री. पोपट दगडू सरगर सरपंच ग्रामपंचायत भांब आणि श्री. विश्वास नाना सिद उद्योजक भांब यांच्यातर्फे होणार आहे.

पै. किरण माने कण्हेर स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा विरुध्द पै. किशोर एकतपुरे वस्ताद शंकर काळे नातेपुते यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रु. २१ हजार रुपयांमध्ये लढत होणार आहे. सदरची कुस्ती दादासो वाघमोडे मा. सरपंच ग्रामपंचायत भांबूर्डी आणि श्री. दादासो यमगर उद्योजक गोरडवाडी यांच्यातर्फे होणार आहे. पै. अजिंक्य गोरड स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा विरुध्द पै. ऋतिक सरगर झंजेवाडी वस्ताद एकनाथ मारकड यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रु. १५ हजार रुपयांमध्ये लढत होणार आहे. सदरची कुस्ती विष्णू गोरड मा. सरपंच ग्रामपंचायत गोरडवाडी आणि  श्री. महादेव यमगर उद्योजक गोरडवाडी यांच्यातर्फे होणार आहे. पै. भैय्या माने कण्हेर वस्ताद महादेव ठवरे यांचा पठ्ठा विरुध्द पै. अभी बुजबळ नातेपुते वस्ताद शंकर काळे यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रु. ११ हजार रुपयांसाठी लढत होणार आहे. सदरची कुस्ती प्रकाश कदम उद्योजक कदमवाडी आणि श्री. राजू मेटकरी उद्योजक बांगर्डे यांच्यातर्फे होणार आहे. पै. सुरज वाघमोडे कण्हेर स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा विरुध्द पै. समाधान गोरड वस्ताद ज्ञानदेव लोखंडे यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रु. ५ हजार रुपयांमध्ये ही लढत होणार आहे. सदरची कुस्ती दत्तात्रय पंढरीनाथ गोरड इस्लामपूर यांच्यातर्फे होणार आहे. पै. हनुमंत वाघमोडे कण्हेर स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा विरुध्द पै. मारुती रूपनवर वस्ताद शंकर काळे यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रु. ५ हजार रुपयांमध्ये लढत होणार आहे. सदरची  कुस्ती श्री. महादेव करडे इस्लामपूर यांच्यातर्फे होणार आहे. पै. सुरज काळे कण्हेर गंगावेश तालीम वस्ताद विश्वास हरगुले यांचा पठ्ठा विरुध्द पै. सागर खरात वस्ताद कै. बाजीराव देशमुख यांचा पठ्ठा यांच्यात इनाम रु. ५ हजार रुपयांमध्ये लढत होणार आहे. सदरची कुस्ती श्री. बाळासाहेब निकम मांडकी यांच्यातर्फे होणार आहे.

सदर कुस्ती मैदानाचे समालोचन पैलवान शंकर आण्णा पुजारी, पैलवान हनुमान शेंडगे, पैलवान धनाजी मदने, पैलवान युवराज केचे, पैलवान परशुराम पवार आदी करणार आहेत. तरी भव्य कुस्ती मैदानास वस्ताद, पैलवान, कुस्ती शौकीनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button