महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांचे विविध मागण्यांकरिता १४ मार्चपासुन एल्गार
पंढरपूर (बारामती झटका)
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सर्वात जिव्हाळ्याची व भविष्यात सुरक्षेची हमी असलेली जुनी पेन्शन योजना लागू करा, बक्षी समितीने अमान्य केलेल्या वेतनत्रुट्या मान्य करून वेतनत्रुटी दूर करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे या प्रमुख मागणीसह इतर महत्वाच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून महासंघाचे राज्य अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांच्या लेखी आवाहनानुसार तसेच महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 14 मार्च 2023 पासून देशव्यापी संपात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा सोलापूरचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच तालुका शाखा पंढरपूरचे सर्व पदाधिकारी व सदस्य सहभागी होणार आहेत.
यासाठी आज तहसिलदार साहेब, पंढरपूर यांना संपाची नोटीस देण्यात आली. तर नोटीसीची एक प्रत पंचायत समिती पंढरपूरचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी प्रशांत काळे साहेब यांना संपाची नोटीस देण्यात आली.
सदर प्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस रमेश कोळी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे मानद जिल्हा अध्यक्ष तथा प्रशासन अधिकारी संघटनेचे प्रफुल्ल माळी, ग्रामसेवक युनियनचे जिल्हा अध्यक्ष तथा महासंघाचे मानद जिल्हा उपाध्यक्ष शरद भुजबळ, महासंघाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष धन्यकुमार काळे, तालुका उपाध्यक्ष सुरेश इंगोले, तालुका सचिव मच्छिंद्रनाथ मस्के, तालुका संघटक अमर वाघमोडे, महासंघाचे कृषि अधिकारी संघटनेचे प्रतिनिधी दत्तात्रय रावते, लेखा संघटनेचे मंगेश शिंदे, महिला प्रतिनिधी मनिषा थोरात, जयश्री माने, प्रेरणा हंबीर तसेच महासंघाचे इतर सर्व सदस्य उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng