Uncategorizedताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण जागर महामेळाव्याचे आयोजन

फलटण (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण जागर महामेळाव्याचे आयोजन शनिवार दि. ८/४/२०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता धुळोबा देवस्थान धुळदेव, फलटण, ता. फलटण येथे करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री अण्णा डांगे, माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, माजी मंत्री महादेव जानकर, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री रामहरी रुपनवर, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार रामराव वडकुदे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकते, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे, सांगोल्याचे नेते बाबासाहेब देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, फलटणचे नेते दादासाहेब चोरमले आदी मान्यवर असणार आहेत.

तसेच मच्छिंद्र ठवरे, गणपतराव वाघमोडे, हनुमंत सूळ, डॉ. मारुती पाटील, तुकारामभाऊ देशमुख, आप्पासाहेब देशमुख, माणिकबापू वाघमोडे, बाळासाहेब ठवरे, सोपानकाका नारनवर, गौतमआबा माने, सोमनाथ अण्णा वाघमोडे, बाळासाहेब कर्णवर, किशोर सुळ, सुरेश पालवे, मधुकर पाटील, हनुमंतराव रुपनवर, बाबासाहेब माने, रमेशभाऊ पाटील, महादेव देशमुख, बाजीराव माने, अजित बोरकर, शिवाजी देशमुख, जयवंत पालवे, मारुती पाटील, अण्णा रुपनवर, सुरेश पाटील, राहुल वाघमोडे, शामराव वाघमोडे, रामभाऊ काळे, संजय मोरे, भगवानराव चोरमले, दत्तात्रय शेळके, अनिल कोयले, शाम तात्या मदने, विष्णुपंत नारनवर, बाळासाहेब काळे, कुंडलिक सरगर, युवराज झंजे, अशोक देशमुख, सचिन वावरे, एडवोकेट आप्पा वाघमोडे, बाळासाहेब वावरे, सुरेश टेळे, डॉ. अनिल पारोळ, बाळासाहेब सरगर, ज्ञानदेव लोखंडे, हनुमंतराव पाटील, अजिनाथ वळकुंदे, महादेव ठवरे, सतीश मोटे, सुरेश आबा वाघमोडे, भगवान नाना थोरात, रामभाऊ कचरे, सतीश कुलाळ, सुमित जानकर, मनोज दडस, शिवराज पुकळे, विष्णू गोरड, उल्हास वाघमोडे, संतोष आबा वाघमोडे, लक्ष्मण गोरड, सौरभ बागनवर, पोपट सरगर, शिवाजी ठवरे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

या धनगर आरक्षण जागर महामेळाव्याचे आयोजन पांडुरंगतात्या वाघमोडे माळशिरस, शिवाजी बंडगर करमाळा, बाळासाहेब मासाळ म्हसवड, ज्ञानदेव चौरे इंदापूर, बिरुदेव कोळेकर कवठे महांकाळ, गणपतआबा देवकाते बारामती, रणजीत सोनवलकर फलटण, माऊली वाघमोडे इंदापूर, माऊली मारकड भागवून, दादासाहेब कचरे आटपाडी, गोरख पांढरे पंढरपूर, मच्छिंद्र गोरड (सर) माळशिरस, किशोर सलगर माढा, बंटी लवटे सांगोला, शामराव बंडगर माळशिरस, शालीवान कोळेकर पंढरपूर, सचिन होनमाने (सर) माण, डी. एन. बीवलकर फलटण, येथे तात्या पाटील कवठेमहांकाळ, बजरंग गावडे फलटण, दादासाहेब काळे माण, रवी वाघमोडे अक्कलकोट, संतोष वाकसे सोलापूर, शंकराव आप्पा मारकड फलटण, दिनेश हुभाले माण, विकास लवटे पुणे, वेंकटराव आप्पा दडस फलटण, ऋषिकेश धायगुडे खंडाळा, शांतीलाल रुपनवर जामखेड, बजरंग खटके फलटण, बाळासाहेब काळे माण, आदित्य फत्तेपूरकर पंढरपूर यांनी केले आहे.

यावेळी धनगर समाजातील अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार समारंभ तसेच गजी ढोल कार्यक्रम स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. तरी या धनगर आरक्षण जागर महामेळाव्यास जास्तीत जास्त धनगर बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button