Uncategorized

महावीर (दादा) शेंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त जांबुड येथे भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन

जांबुड (बारामती झटका)

जांबुड ता. माळशिरस येथे महावीर दादा शेंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल भैया झुरूळे आणि महावीर (दादा) शेंडगे मित्र परिवाराच्या वतीने रविवार दि. २५ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वा. भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन युवा उद्योजक विनायक शेठ मासाळ, माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजुशेठ जानकर, बिरा शेठ खांडेकर, दादाशेठ कचरे, माळशिरस नगर पंचायतीचे नगरसेवक विजय देशमुख, धानोरेचे सरपंच जीवन जानकर टायगर ग्रुप चे अक्षय भैया बंडगर, पांडुरंग तात्या वाघमोडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, बिराभाई शिंदे, नानासो तरंगे, जलनायक शिवराज भाऊ पुकळे, पै. अक्षय भाऊ वगैरे, मोहन झंजे पाटील, संजय आप्पा वाघमोडे मा. सो. चेअरमन, उडान फाउंडेशन पुणे चे तुकाराम दादा शेंडगे, युवा उद्योजक पांडुरंग हाके, कुस्ती मल्लविद्या माळशिरस तालुका कार्याध्यक्ष पै. विष्णू झुरूळे, प्रगतशील बागायतदार नवनाथ शेंडगे आदी मान्यवर प्रमुख उपस्थितीत असणार आहेत.

यावेळी युवा उद्योजक विनायक शेठ मासाळ यांच्यावतीने ५१,००० रू., महावीर दादा शेंडगे महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष पै. अमोल भैया झुरूळे यांच्या वतीने ४१,००० रू., हॉटेल जय मल्हार साळमुखचे विकास दादा कोकरे आणि बिराभाई शिंदे यांच्या वतीने ३१,००० रू., कु. ऋचा ब्रह्मदेव गोडसे यांच्यावतीने २१,००० रू., रामदास शेंडगे यांच्यावतीने ११,००० रू., बापू होनमाने यांच्यावतीने ७,००० रु. अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. ‌

याप्रसंगी महावीर (दादा) शेंडगे मित्रपरिवार महाराष्ट्र राज्य युथ आयकॉन पुरस्कार २०२२ हा पुरस्कार नाळ फाउंडेशन, पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य आणि भाजपाचे सचिव ॲड. सुजित भाऊ थिटे, भाजपच्या सातारा जिल्हा महिला सचिव ॲड. प्रियदर्शनी ताई कोकरे, अहिल्या कवी सचिन शिंगाडे, युवा उद्योजक सागर वसंत पवार, एस. के. ब्रदर्सचे सचिन कुलदीप, युवा उद्योजक बाळासो सलगर, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष अजित दादा पाटील, बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनेलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवरांना देण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button