मांडवे येथील रत्नत्रय शैक्षणिक संकुलात जीवन सहारा परिवाराच्यावतीने चित्रकला व रांगोळी स्पर्धा संपन्न
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन – अनंतलालदादा दोशी, संस्थापक अध्यक्ष, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी
मांडवे (बारामती झटका)
मांडवे ता. माळशिरस येथील रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व जीवन सहारा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर जयंतीच्या निमित्ताने चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. १८ मार्च रोजी करण्यात आले. यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेचे उद्घाटन रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अनंतलालदादा दोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

सदर प्रसंगी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी, रत्नत्रय इंग्लिश मीडियम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रमोदभैय्या दोशी, जीवन सहारा परिवारचे अध्यक्ष सागर अजितकुमार फडे, सदस्य आनंद राजीव शहा, प्रतीक संजय दोशी, पियुष जवाहरलाल दोशी, सतीश सुकुमार दोशी, प्रितेश महावीर गांधी, सचिन सुरेश दोशी, चंद्रकात तोरणे, श्रीकृष्ण पाटील सर, दैवत वाघमोडे सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

या उद्घाटन प्रसंगी अनंतलाल दादा दोशी यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले. तसेच यावेळी प्रमोदभैय्या दोशी बोलताना म्हणाले की, आजचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद व गरजेचा आहे. विद्यार्थ्यांना आवड असणाऱ्या क्षेत्रात काम करण्यासाठी संधी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम पूरक असतात. विद्यार्थ्यांनी आवड असणाऱ्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतल्यावर निश्चित यशाचे शिखर प्राप्त होते. त्यासाठी विद्यार्थ्यातील असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांनी काम करण्याचे आवाहन करून स्पर्धेत सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैवत वाघमोडे सर यांनी केले तर, सूत्रसंचालन रणदिवे मॅडम यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन आनंद राजीव शहा सर यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
