माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सरपंचाच्या विकास कामांचे कौतुक केले तर उद्योजकाच्या सामाजिक कार्याबद्दल दिली शाब्बासकीची थाप.
अकलूज ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांनी एकशिव गावचे लोकप्रिय नेते व माजी सरपंच शहाजी दादा धायगुडे यांनी गावांमध्ये राबविलेल्या विकास कामांचे कौतुक करून उद्योजक सतीश तात्या ढेकळे यांनी एकशिव पंचक्रोशीमध्ये समाज हिताचे केलेले समाजकार्य व कोरोना कालावधीत जनतेला अडचणीच्या काळात केलेल्या सहकार्याबद्दल शाबासकीची थाप शिवरत्न बंगला येथे भेटी दरम्यान दिलेली आहे. त्यावेळी प्रवीणशेठ पांढरकर, ग्रामपंचायत सदस्य दशरथ नाना जाधव, अंकुश जाधव, शंकर जानकर, संजय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.


विधान परिषदेचे आमदार युवा नेते रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्याशी एकशिव गावच्या विविध विकास कामांची मागणी व इतर योजनांबाबत चर्चा करण्याकरता शिवरत्न येथे एकशिव गावचे शिष्टमंडळ गेलेले होते. त्यावेळी विजयदादांची आवर्जून भेट घेतलेली होती.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

