माजी मंत्री महादेवराव जानकर यांची स्वर्गीय सौ. जिजाबाई सातपुते यांच्या परिवारांची सांत्वनपर भेट.
आष्टी (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवरावजी जानकर यांनी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे दुःख निधन झालेले असल्याने डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड येथील निवासस्थानी शुक्रवार दि. 30/06/2023 रोजी सायंकाळी सांत्वनपर भेट दिली. यावेळी श्री विठ्ठल सातपुते व सातपुते परिवारातील सदस्य उपस्थित होते.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे सोमवार दि. 26/06/2023 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्यावर मूळगावी डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड येथे अंतिम संस्कार करण्यात आलेले होते. सर्व विधी क्रियाकर्म करून शुक्रवार दि. 30/06/2023 रोजी सर्वांना भेटीसाठी माळशिरस मतदारसंघात उपलब्ध झालेले आहेत.
सरसेनापती महादेवराव जानकर विधिमंडळातील सदस्य राम सातपुते यांच्या मातोश्रीच्या दुःखद निधनाची बातमी समजल्यानंतर सातपुते परिवार यांची सांत्वन पर भेट घेण्यासाठी मूळ गाव डोईठाण येथे गेलेले होते. यावेळी स्वर्गीय सौ. जिजाबाई सातपुते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्री विठ्ठल सातपुते यांच्याशी विचार विनिमय व हितगुज साधून संपूर्ण सातपुते परिवारांची माहिती जाणून घेतली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng