माझा मुलगा असं करूच शकत नाही, मृत सलीमच्या आईची व्यथा…

प्रशासनाने योग्य कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा – मृत सलीमची पत्नी
चौंडेश्वरवाडी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी हद्दीतील उदयनगर येथील सलीम मोहिद्दीन सय्यद यांचा मृतदेह उदयनगर विजय वाडी रोडवर कॅनलच्या लहान पुलाच्या भिंतीला मृत अवस्थेत लटकलेला असल्याने सलीम सय्यद यांची आत्महत्या की हत्या ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण त्यांचा मृतदेह ज्या ठिकाणी लटकावला होता ती भिंत साधारणपणे दोन फूट उंचीची आहे. ते वाकले असले तरीसुद्धा ते अंतर कमीच आहे. त्यामुळे त्यांचा मृतदेह जरी लटकवलेला असला तरी, संशय व्यक्त केला जात आहे.
सलीम सय्यद हे बांधकाम मजुरीचा व्यवसाय करत होते. गरीब परिस्थितीमुळे त्यांना कर्ज झाले होते. त्यामुळे ते नेहमी तणावाखाली असत. मात्र, दररोज कामावर जात असत. त्यामुळे त्यांनी नक्की आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, अशी शंका सोशल मीडिया मधून व्यक्त केली जात आहे.
सलीम सय्यद यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना जबाब दिला आहे. सलीम सय्यद यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य तपास व कारवाई करावी, अशी मागणी सय्यद परिवार यांच्याकडून होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng