Uncategorizedताज्या बातम्या

माझी चूक नसताना मला मानसिक त्रास कशासाठी, मी महिला ग्रामसेविका आहे म्हणून का ? – शीला साळवे, ग्रामसेविका

गावपातळीवरील अडचणी सोडवून चांगले काम केले, तरीही असा त्रास होत आहे, मग सक्षमीकरण होईल का ?

धर्मपुरी (बारामती झटका)

मी साळवे ग्रामसेविका गेली सहा महिन्यापासून मौजे धर्मपूरी येथे ग्रामसेवक या पदावर कार्यरत आहे. मी चार्ज घेण्यापूर्वी गावात एकही योजनेचे काम चालु नव्हते. विशेषतः १४ वा वित्त आयोग निधी २२००००० रु. अद्याप अखर्चित होता. महत्वाचे हायवेला गेलेली पाणीपुरवठा विहिरीचा प्रश्न सुद्धा खूप गंभीर होता. १५ वा वित्त आयोग योजनेचे एकही काम गावात चालु नव्हते. एवढेच नव्हे तर तर गावात करवसुलीसारखा विषयपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे. लोकांच्या घरोघरी जाऊनफिरून करवसूली करून १) १०% महिला बालकल्याण खर्च १००% २) १५% खर्च १००% ३) ५% अपंग कल्याण खर्च १००% तसेच गावात व वेगवेगळे उपक्रम राबविले. ही सर्व कामे मी खूप कमी कालावधीत केली. त्यात अतिशय महत्वाचे असे की, ही कोणतीही कामे सहजासहजी झालेली नाहीत. यासाठी मला खूप अडचणींना सामोरे जावे लागले आहे. पण मी नेहमीच जीथे काम करत असेल ते ‘”माझं गाव म्हणून काम करते” आणि चांगल्या कामासाठी. मला संघर्ष करायला पण आवडतं, जिथ चांगले असेल तिथं. मी माझ्या त्रासाचा पण मी कधी विचार करत नाही. आणि ही चांगली कामे करत असताना माझ्या पाठीवर असलेली. माझ्या प्रशासनाची कौतुकाची थाप. मी माझ्या प्रशासनाला “मायबाप” समजते. मग एवढ्या अडचणीच्या गावात एवढे चांगले काम करून माझीच 2 दिवसाला बदली का ? नोकरीत काम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या तक्रारी आहेत. पण माझ्याबाबतीत चार्जचे बदलीचे नियम का वेगळे ? साहेब खरं सांगायचं झालं तर मी माझ्या पूर्ण नोकरीच्या काळात अनेक चांगली कामे केलेली आहेत. अनेक आदरणीय गटविकास अधिकारी यांनी माझे खूप कौतुक केलेले आहे. अनेक गावात मी वेगवेगळे पुरस्कार मिळवलेले आहेत आणि कोणतीच गोष्ट मला सहजासहजी मिळालेली नाही. प्रत्येक गोष्टीत मी संघर्ष केलेला केलेला आहे. मग ही चांगल्या कामाची शिक्षा अशी. मला वाटायचं एवढे दिवस धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या विहिरीचा प्रश्न मार्गी लागत नव्हता तो एवढ्यात तातडीने मी चार्ज घेतले. बक्षीस पत्र करून विहिरीच्या कामाचा प्रश्न मार्गी लावला. मला वाटलं साहेब माझं खूप कौतुक करतील आणि त्यांची शाब्बासकी मिळाली कि, अजून चांगली कामे करण्याच्या संकल्पना मी करत होते. मी कधी विचार पण केला नव्हता की एवढ्या चांगल्या कामाची शिक्षा मला अशी मिळेल. कदाचित प्रशासनात चांगली कामे करत असताना अशी शिक्षा मिळते म्हणूनच कदाचित प्रशासनात चांगले ग्रामसेवक घडत नसावेत.

माझ्याकडून कीतीही काम करून घ्या, पण माझ्यावरच असा अन्याय का ? मी एकटीच नाही की, ग्रामसेवक म्हणून काम करत असताना माझ्याच तक्रारी होत आहेत. पण माझ्याच बाबतीत इतके वेगळे नियम का लावले जातात ? धर्मपूरी ग्रामपंचायतीचा हायवेला गेलेल्या विहीरीचा इतका गंभीर विषय मी आपल्या आदेशानेच मार्गी लावला. माझी काहीच चूक नसताना एवढे चांगले काम करत असताना माझी आठ दिवसालाच बदली का ? एवढे असूनसुद्धा मी आपल्या आदेशाचा अवमान न करता ऑर्डर झालेल्या प्रत्येक ग्रामसेवकांना चार्ज देणेसाठी फोनद्वारे संपर्क केलेला आहे परंतु, कोणीही ग्रामसेवक चार्ज घेणेसाठी आलेले नाही. मला माझ्या मुळ सजा असलेल्या शिंगोर्णी ग्रामपंचायतीचा चार्ज घेणे संदर्भात पण मी संपर्क साधला आहे. सदर ग्रामपंचायतीचा पण मला पदभार मिळत नाही. सदर ग्रामपंचायतीचा पदभार मिळाला की, मी धर्मपूरी ग्रामपंचायतचा पदभार देत आहे. पण हा अन्याय माझ्यावरच का ? मी एक महिला ग्रामसेविका आहे म्हणून ? याचा मला खूप मानसिक त्रास होत आहे. मी कधीच वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केलेला नाही. मग माझी चूक नसताना मला असा मानसिक त्रास कशासाठी.

आम्ही गावपातळीवर चांगली कामे करतो सगळ्यांना विचारात घेवून काम करतो मग, महिलांना का त्रास होतो ? महिला सरपंच असो, ग्रामसेवक असो, गावपातळीवर एवढ्या अडचणी असताना चांगल काम करतो, असा त्रास होत असेल तर महिला सक्षमीकरण होईल का ?

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort