माझ्या तालुक्याची तहान भागल्याशिवाय निरा-देवधरचे एक थेंबसुद्धा पाणी इतरत्र नेऊ देणार नाही – जलनायक शिवराज पुकळे
माळशिरस (बारामती झटका)
निरा -देवघर पाटबंधारे प्रकल्प तालुका भोर, जि. पुणे, प्रकल्पाच्या रुपये 3976.83 कोटी इतक्या किमतीस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने शासन निर्णय क्रमांक सुप्रमा/११२२/प्र.क्र.४२७/२०२२/मोप्र-१ दि. ८ मार्च २०२३ रोजी निघालेला आहे. यामध्ये निरा-देवधर प्रकल्पाच्या एकूण पाणी वापरामधून 0.93 अ.घ.फु(TMC) पाणी धोम-बलकवडी प्रकल्पासाठी देण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करमाळा येथील दौऱ्यामध्ये निरा-देवधर प्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या पाण्यापैकी १ टीएमसी पाणी उजनी धरणामध्ये टाकून ते करमाळा तालुक्यासाठी देणार, अशी घोषणा गेल्या आठवड्यामध्ये केलेली आहे.
निरा-देवधर धरण हे भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस या चार तालुक्यासाठी बनलेले असून या चार तालुक्यांसाठी आठमाही पीक रचनेनुसार सिंचन लाभ मिळणार आहे. असे असताना माळशिरस तालुक्यातील कोथळे, फडतरी, लोंढे-मोहितेवाडी, भांब, जळभावी, तरंगफळ, गारवाड, मगरवाडी, पठाणवस्ती, सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी या गावांचा या प्रकल्पामध्ये समावेश नसल्यामुळे या गावांना निरा-देवधरचे पाणी मिळणार नाही. माळशिरस तालुक्यासाठी निरा-देवधर प्रकल्पामध्ये 2.98 टीएमसी पाणी आहे. त्यापैकी 1.88 टीएमसी पाणी मधून माळशिरस तालुक्यातील १०९७० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून १.१० टीएमसी पाणी शिल्लक राहत आहे. १.१० टीएमसी पाण्यामधून माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी असणारी गावे या प्रकल्पांमध्ये समाविष्ट होऊ शकतात. असे असताना जर निरा-देवधरच्या शिल्लक पाण्यामधून जर पाणी इतरत्र गेले तर माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी वंचित असलेली बारा गावे कायमस्वरूपी दुष्काळी राहणार आहेत. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग बैठक क्रमांक ०१२३/प्र.क्र.२४/२३/मोप्र-१ या बैठकीचे इतिवृत्त दि. १६/०३/२०२३ रोजी मेल द्वारे प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये निरा-देवधर प्रकल्पाच्या एकूण शिल्लक पाणी वाटपासाठी २ महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे निरा-देवधर प्रकल्पातील शिल्लक पाण्याचे वाटप झाले तर माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी गावांना पाणी कधीच मिळणार नाही.
त्यामुळे नीरा-देवधर पाण्यासाठी संघर्ष करणारे जलनायक शिवराज पुकळे यांनी निरा-देवधरच्या प्रकल्पामधून शिल्लक राहिलेले पाणी इतरत्र नेण्यास तीव्र विरोध केलेला आहे. जर माळशिरस तालुक्यातील गावे यामध्ये समाविष्ट न होता जर पाणी इतरत्र नेण्याचा डाव जर कोण करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये भविष्यामध्ये प्रचंड आंदोलन उभा करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Fantastic perspective! The points you made are thought-provoking. For additional insights, check out this link: FIND OUT MORE. What do others think about this?