माढा तालुका माळी महासंघ महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा भानवसे यांची निवड

माढा (बारामती झटका)
माढा तालुका माळी महासंघ महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी कुर्डुवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनीषा दत्तात्रय भानवसे यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. आगामी एक वर्षाकरीता ही निवड करण्यात आली आहे. माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर जांभळे यांनी त्यांची निवड जाहीर केली आहे.
माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे, माळी महासंघ महाराष्ट्र राज्य किसान आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव वाघमारे यांच्याशी चर्चा करून ही निवड करण्यात आली आहे.
या निवडबद्दल तालुक्यातील माळी समाजातून आनंद व्यक्त होत आहे. या निवडी बद्दल शंकरराव वाघमारे, रंगनाथ नाळ, विश्वस्त भारत माळी, सौ. संध्याताई देशकर, तालुका अध्यक्ष बालाजी राऊत, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश राऊत आदींनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

या निवडी नंतर सौ. मनीषा दत्तात्रय भानवसे यानी आगामी काळात समाजातील महिलांना सोबत घेवून माळी महासंघाच्या विचाराशी जोडणार असून माळी महासंघाचा विस्तार व्हावा असा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng