Uncategorized

मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी खेळाची गरज – शिवतेजसिंह मोहिते पाटील

अकलूज (बारामती झटका)

आज शनिवार दि. 27 मे 2023 रोजी अकलूज येथे मिशन आयुर्वेद, महाराष्ट्र राज्य, सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना व राष्ट्रसंचार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग 2023 च्या क्रिकेट स्पर्धचे उद्घाटन अकलूजचे मा. सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते तर भाजपा वैद्यकीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपळे, भाजपा भटक्या विमुक्त जमाती सेलच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. उज्वला हाके, एम.सी.आय.एम.मा. सदस्य डॉ. तानाजीराव कदम यांच्या उपस्थितीत अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल येथे संपन्न झाला.

यावेळी प्रास्ताविकात महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासकीय सदस्य तथा सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी धावपळीच्या व व्यस्त जीवनात डॉक्टरांनी शरीराकडे लक्ष देणे आवश्यक असून त्यांच्यामध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी गेल्या वर्षीपासून संघटनेच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. दरवर्षी संघटना अनेक लोकोपयोगी सामजिक उपक्रम राबवत असून यामध्ये मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन, रक्तदान शिबिराचे आयोजन, डॉक्टरांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी चर्चासत्रांचे आयोजन असे अनेक उपक्रम राबविले जातात, याची माहिती दिली.

सदर उद्घाटनप्रसंगी अकलूजचे मा. सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी आजपर्यंत अकलूजमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन होत असते, मानसिक व शारीरिक आरोग्य तंदुरुस्त रहावे, यासाठी खेळाची गरज असते. डॉक्टरांच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे अकलूजला आयोजन करून अकलूजच्या वैभवात भर घातली त्याबद्दल संघटनेचे कौतुक केले.

प्रमुख पाहुणे भाजपा वैद्यकीय सेलचे राज्य उपाध्यक्ष तथा एम.सी.आय.एम. सदस्य डॉ. बाळासाहेब हरपळे यांनी मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी कोणताही खेळ खेळणे आवश्यक असून क्रिकेटसारखा दुसरा खेळ नाही असे सांगत राज्यभरातून आलेल्या खेळाडूंचे कौतुक केले.

भाजपा भटक्या विमुक्त जमाती सेलच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. उज्वला हाके यांनी पुरुषांबरोबर महिला डॉक्टरांनीसुद्धा खेळांमध्ये सहभाग नोंदवून आम्ही सुद्धा कमी नाही हे दाखवून देण्याची गरज असल्याचे सांगत मिशन आयुर्वेद व होमिओपॅथिक जिल्हा संघटनेच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी महाराष्ट्र नर्सिंग कॉलेज असोसिएशनचे राज्य समन्वयक डॉ. राहुल जवंजाळ, जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे सदस्य डॉ. विठठ्लराव कवितके, शिवाजीराव काळे, डॉ. योगेश घोगरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ. संजय सिद, स्त्रीरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. विनोदकुमार शेटे, निमाचे अध्यक्ष डॉ. शिरीष रणनवरे, होमिओपॅथिक संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. अभिजीत राजे भोसले, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड, सोलापूरचे डॉ. विकास स्वामी, डॉ. संग्राम कीलमिसे, डॉ. चंद्रशेखर टेंगले, डॉ. मिलिंद गाढवे, डॉ. तुषार माने, डॉ. अभिजित पाटील, डॉ. सचिन वायदंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

आज झालेल्या क्रिकेट स्पर्धमध्ये सोलापूर वॉरियर्स डॉक्टर्स व द रॉयल किंग, बारामती या दोन संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा क्रिकेट प्रेमींसाठी मैदानावर व युटयुबवर मोफत दाखवली जात आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन मिशन आयुर्वेदाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन गायकवाड, क्रिडा समितीचे प्रमुख डॉ. अनिल बळते, क्रीडा समितीचे सचिव डॉ. नागनाथ दगडे, सदस्य डॉ. अनिस शेख, डॉ. नितिन कुबेर, डॉ. छाया दगडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साठे यांनी केले तर आभार डॉ. अनिल बळते यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button