Uncategorized

क्रिकेट प्रेमींना आनंदाची बातमी आयपीएल मधील चेन्नई विरुद्ध गुजरात अंतिम सामना मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची सुवर्णसंधी…

पोलीस भरती मधील तरुण-तरुणींचा नागरी सत्कार शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार…

वेळापूर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील वेळापूर व वेळापूर पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमींसाठी श्री महादेव देवालय देवस्थान ट्रस्ट भक्तनिवास, वेळापूर या ठिकाणी आयपीएलचा चेन्नई विरुद्ध गुजरात असा होणारा अंतिम सामना मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची सुविधा रविवार दि. २८/५/२०२३ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून करण्यात आली आहे.

यासाठी श्री महादेव देवालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराजभैय्या माने देशमुख व युवा नेते स्वप्निलभैय्या माने देशमुख यांच्या वतीने नियोजन करण्यात आले असून या ठिकाणी मोठ्या पडद्यावरती आयपीएलची फायनल मॅच पाहण्याची संधी मिळणार आहे.

त्याचबरोबर या मॅचदरम्यान वेळापूर व पंचक्रोशीतील पोलीस भरती झालेल्या तरुण व तरुणींचा नागरिक सत्कार सोहळा आयोजकांच्या वतीने ठेवण्यात आला असून या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवरत्न उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व अकलूज गावचे माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील उर्फ शिवबाबा हे उपस्थित राहणार आहेत.

तरी माळशिरस तालुक्यातील क्रिकेट प्रेमींनी आयपीएलचा अंतिम सामना मोठ्या पडद्यावरती पाहण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort