Uncategorized

माळशिरसचे निवासी नायब तहसीलदार श्री. अमोल कदम यांची नियुक्ती झाली आहे.

माळशिरस (बारामती झटका)

तहसील कार्यालय माळशिरस येथे तहसीलदार पदावर कार्यरत असणारे श्री. तुषार देशमुख यांची फलटण प्रांत कार्यालय येथे बदली झालेली होती. त्यांच्याकडे तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार पदाचा पदभार होता. रिक्त असणाऱ्या निवासी नायब तहसीलदार पदी श्री. अमोल कदम यांची नियुक्ती झाली आहे.

माळशिरस तहसील कार्यालय येथे निवासी नायब तहसीलदार या पदावर तुषार देशमुख यांनी दि. 14 ऑगस्ट 2018 साली पदभार घेतलेला होता. त्यांची फलटण प्रांत कार्यालयात दि. 25 मे 2023 रोजी बदली झालेली होती. निवासी नायब तहसीलदार रिक्त असणाऱ्या पदी वर्धा जिल्ह्यातील आर्वी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून काम करीत होते. अनेक ठिकाणी त्यांनी नायब तहसीलदार म्हणून काम केलेले आहे. श्री. अमोल कदम यांचे मूळ गाव माण तालुक्यातील असून निवासी नायब तहसीलदार पदाचा ते लवकरच पदभार घेतील.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button