माळशिरस तहसील कार्यालयाकडून कैद्यांच्या जेवणासाठी मोहोरबंद निविदेची मागणी
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तहसील कार्यालयाच्या वतीने जाहीर निवेदन करण्यात आले आहे. सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तहसील कार्यालय माळशिरस येथील नवीन इमारतीमधील वापरात येत असलेल्या दुय्यम कारागृहात ठेवण्यात येणाऱ्या बंदीकरिता निविदा मंजूर झाल्याच्या दिनांकापासून ते दि. ३१/१२/२०२३ या कालावधीमध्ये दररोज चहा, नाश्ता, दोन वेळचे शिजवलेले अन्न व पिण्याचे पाणी पुरवठा करण्याबाबत शासकीय नियमाप्रमाणे ठेका देण्याकरिता मोहोरबंद निविदा मागवण्यात येत आहे.
निविदा स्वीकारण्याची अंतिम दि. १४/२/२०२३ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत राहील. अधिक माहितीसाठी माळशिरस येथील तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील या निवेदनात करण्यात करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng