माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू स्पर्धा परीक्षा केंद्र माळशिरस आयोजित अकलूज मधील एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न
अकलूज ( बारामती झटका )
माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतु स्पर्धा परीक्षा केंद्र माळशिरसच्या वतीने माळशिरस तालुक्यातील इयत्ता 12 वी, पदवीचे शिक्षण घेत असलेले व जे पदवीधर असून सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी अकलूजमधील स्मृती भवन येथे आयोजीत केलेल्या एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे प्रास्ताविक श्री. अमरसिंह पाटील उपाध्यक्ष माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान यांनी केले.
सदर मार्गदर्शन शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप स्वामी IAS, माळशिरस तालुका उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. बसवराज शिवपूजे, अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. दयानंद गोरे, माळशिरस तालुका गट विकास अधिकारी श्री. विनायक गुळवे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्री. इंद्रजीत यादव, स्पर्धा परीक्षा क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा/मार्गर्शनाचा ठसा उमटविणारे दी लॉयन करिअर अकॅडमीचे संचालक श्री. उत्तम पवार, श्री. अमोल ताकमोघे गट विकास अधिकारी पंचायत समिती निलंगा, श्री. लक्ष्मण डाके उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज, श्री. अरुण सुगावकर पोलीस निरीक्षक अकलूज, श्री. किरण मोरे सहा. गट विकास अधिकारी माळशिरस आदी अधिकारी उपस्थित होते.

सदर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे दीप प्रज्वलन मा. डॉ. दिलीप स्वामी (IAS), श्री. उत्तम पवार यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मा. विनायक गुळवे यांनी स्वत:पासून भाषणाची सुरुवात करीत माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान करीत असलेल्या कामाचे कौतुक करीत प्रतिष्ठानच्या कामास सर्वोत्तपरी सहकार्य करणार असल्याचे नमूद करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मा. बसवराज शिवपूजे (DYSP) यांनी उपस्थित मुलांना स्पर्धा परीक्षेची बदलणारी परीक्षा पद्धती आणि त्यास अनुसरून स्वतःमध्ये करावा लागणारा बदल तसेच वास्तविक स्पर्धा याबद्दल भाष्य करून ‘There is no shortcut to Success’ याबाबत अचूक मार्गदर्शन करीत मुलांना सजग केले. मा. दिलीप स्वामी (IAS) यांनी माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानच्या अभिनव कार्याचं कौतुक करीत माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान सारखं दुसरं कोणतं प्रतिष्ठान कार्य करीत आहे, असे आजपर्यंत ऐकिवात नाही, असे गौरवोद्गार काढले.
स्वामी यांनी उपस्थित मुलांना कार्यक्रम स्थळी पाच वातीने दीपप्रज्वलित केलेल्या समईकडे पाहत त्यांना पंचप्रज्वलित समईच्या प्रत्येक स स चा अर्थ उलगडून सांगितला. तो म्हणजे समई तील पहिला स म्हणजे – संपर्क, दुसरा स म्हणजे सहकार्य, तिसरा स म्हणजे समन्वय, चौथा स म्हणजे सल्ला, पाचवा स म्हणजे संयम ई. बाबत सांगून स्पर्धा परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणारी मुले 0.30% असल्याचे सांगत मुलांनी स्वतःला अतिहुशार समजू नये, त्यासाठी त्यांनी मुलांना (पुढील उदाहरणे दिली – पेपर सोडविताना पेपर खाली लिहले जाणारे प्लिज टर्न ओव्हर, & युपीएससी मुलाखती दरम्यान एका मॅडमने परिक्षर्थ्याला विचारलेला जर ..तर चा प्रश्न) एम.पी.एस.सी किंवा यु.पी.एस.सी ला परीक्षेत विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षीत आहे याबाबत सांगितले. मा. प्राचार्य डॉ. श्री. इंद्रजीत यादव यांनी व्यक्तिमत्व विकासाबद्दल विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.


आजच्या कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची चळवळ उभा करणारे व सदर मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक श्री. उत्तम पवार यांनी उपस्थित मुलांना विशेषतः ऑक्टोबर 2022 मध्ये होणाऱ्या एम.पी.एस.सी. संयुक्त परीक्षा गट – ब ला कमी दिवसात कसे सामोरे जावे, काय वाचू नये, काय वाचावे, आपल्यातील आत्मविश्वास कसा वाढवावा याबद्दल व आपणास अधिकारी का व्हावेसे वाटते ?, आपल्या मनातील स्वप्नांना आकार देण्यासाठी अचूक मार्गदर्शन प्राप्त करून स्पर्धा परीक्षेत लवकर यशस्वी कसे व्हायचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्पर्धा परीक्षेत कष्टाला पर्याय नाही. या विषयावर सलग चार तास सविस्तर मार्गदर्शन केले.
माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. अमरसिंह पाटील यांनी प्रतिष्ठान लवकरच स्वतःच्या मालकीच्या जागेत वास्तू उभारणार असल्याचा मानस व्यक्त केल्याचा धागा पकडत सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमधील पोटेंशीअल आणि माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे कार्य पाहून उत्तम पवार सर यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत भविष्यात माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान तर्फे उभा राहणाऱ्या स्पर्धा परीक्षा संकुलाच्या पहिल्या माळ्यासाठी 1लाख 11 हजार रु. तर दुसऱ्या माळ्यासाठी 1 लाख 51 हजार रु. देण्याचे घोषित केले.
सदर वेळी माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सोमनाथ कर्णवर यांनी माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानच्या स्वमालकीच्या वास्तूचे तालुक्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी प्रतिष्ठानचे सर्व प्रमुख मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत मा. उत्तम पवार सरांच्या हस्ते पहिली विट लावण्यात येईल अशी ग्वाही दिली. ज्ञानसेतु स्पर्धा परीक्षा केंद्र माळशिरस यांनी अकलूजच्या स्मृती भवनमध्ये आयोजीत केलेल्या निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरास माळशिरस तालुका पंचक्रोशीतून उत्तम प्रतिसाद मिळाला असून सुमारे 1 हजार विद्यार्थी आणि 100 पालक, व काही पत्रकार बंधू उपस्थित होते.


सदरचा कार्यक्रम माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे श्री. सोमनाथ कर्णवर पाटील सहा. पोलीस निरीक्षक, अमरसिंह पाटील उप अधीक्षक भूमी अभिलेख मुंबई, सुनील कर्चे समाज कल्याण निरीक्षक, ब्रम्हदेव देशमुख सहा. पोलीस निरीक्षक, हनुमंत वगरे ग्रामसेवक, धनंजय पाटील उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, माणिकराव म्हेत्रे रेल्वे पोलीस नाईक, गोविंद कर्णवर पाटील शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, हनुमंत कोळेकर सहा. मोटार वाहन निरीक्षक, कोमल माने शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सूरज ठवरे शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, संदीप घुले सहा. कृषी अधिकारी, नितिन चव्हाण कृषी अधिकारी, संभाजी वाघमोडे कृषी सहाय्यक, सचिन पाटील तलाठी, संतोष पानसरे ग्रामसेवक, मल्हारी लोखंडे भाऊसाहेब, अनिता वाळुंजकर ताकभाते मॅडम तलाठी, अमित गोरे कृषी सहाय्यक इत्यादींनी कार्यक्रमास उपस्थित राहून माळशिरस तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक नियोजन करून सदरचे मार्गदर्शन शिबीर यशस्वी करून दाखवीले आहे.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे या म्हणीला अनुसरून – जीवनातील चार क्षण ll देऊ तन मन धन ll – माणिकराव म्हेत्रे -9930601795

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
