माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराच्या झंजावाती दौऱ्याचे आयोजन.
पद्मजादेवी मोहिते पाटील, अजित बोरकर, पांडुरंग वाघमोडे, पांडुरंग पिसे, भीमराव फुले, सोनाली पाटील, यांच्यासह कार्यकर्त्यांचा झंजावाती प्रचार दौरा
माळशिरस ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूक 2023 या निवडणुकीच्या प्रचारार्थ माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराच्या झंजावाती दौऱ्याचे आयोजन सोमवार दि. 24/04/2023 रोजी सकाळी 08 ते 06.30 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. सदरच्या दौऱ्यात उमेदवार पद्मजादेवी मोहिते पाटील, श्री. अजित बोरकर, श्री. पांडुरंग वाघमोडे, श्री. पांडुरंग पिसे, श्री. भीमराव फुले, सौ. सुनीता पाटील यांच्या समवेत ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे, भानुदास पाटील, रमेशभाऊ पाटील, भानुदास सालगुडे पाटील, मधुकर पाटील, विठ्ठल पालवे, बाबासाहेब माने, जीवन जानकर, ॲड. वीरेंद्र वाघमारे, किरण साठे, विकास धाईंजे, युवराज झंजे, सोमनाथ पिसे, साहिल आतार, दत्ता भोसले, अजित कोडग, दादासाहेब उराडे, अश्विनी भानवसे, रेखा सुरवसे आदी मान्यवर सोबत राहणार आहेत.
सकाळी 08 वाजता दौऱ्याला सुरुवात होणार असून माळशिरस, गोरडवाडी, जळभावी, मांडकी, रेडे, भांब, कण्हेर, इस्लामपूर, गिरवी, लोंढे मोहितेवाडी, लोणंद, मोरोची, पिंपरी, कोथळे, कारूंडे, मांडवे, जाधववाडी, भांबुर्डी असे झंझावाती दौऱ्याचे नियोजन ठरलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng