माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा झंजावाती दौऱ्याचे आयोजन.
पद्मजादेवी मोहिते पाटील, अजित बोरकर, पांडुरंग वाघमोडे, पांडुरंग पिसे, भीमराव फुले, सोनाली पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा झंजावाती प्रचार दौरा
माळशिरस ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूक २०२३ या निवडणुकीच्या प्रचारार्थ माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा झंजावाती दौऱ्याचे आयोजन रविवार दि. २३/४/२०२३ रोजी ८ ते ५ या वेळेत करण्यात आले आहे. सदरच्या दौऱ्यात उमेदवार पद्मजादेवी मोहिते पाटील, श्री. अजित बोरकर, श्री. पांडुरंग वाघमोडे, श्री. पांडुरंग पिसे, श्री. भीमराव फुले, सौ. सुनीता पाटील यांच्या समवेत ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे, भानुदास पाटील, रमेश भाऊ पाटील, भानुदास सालगुडे पाटील, मधुकर पाटील, जीवन जानकर, युवराज झंजे, सोमनाथ पिसे, साहिल आतार, मोहन निंबाळकर, पोपटराव बोराटे, अतुल सरतापे आदी मान्यवर सोबत राहणार आहेत.
सकाळी ८ वाजता दौऱ्याला सुरुवात होणार असून चाकोरे, तिरवंडी, उंबरे दहिगाव, मेडद, मारकडवाडी, कदमवाडी, फोंडशिरस, पळसमंडळ, बांगर्डे, पिरळे, कुरबावी, एकशिव, शिंदेवाडी, देशमुख वाडी, धर्मपुरी, गुरसाळे, दहिगाव, नातेपुते, तामसीदवाडी, सदाशिवनगर, पुरंदावडे, तर सायंकाळी ८ वा. येळीव असे झंझावाती दौऱ्याचे नियोजन ठरलेले असून दुपारचे जेवण मधुकर पाटील फोंडशिरस व सायंकाळचे जेवण गुलाबराव निंबाळकर येळीव यांच्याकडे राहणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng