ताज्या बातम्या

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात राष्ट्रवादीच्या घड्याळाला चावी मिळाल्याने घड्याळाची टिकटिक वाढणार…

देशमुख घराण्याला राजकीय व अध्यात्माचा वारसा लाभलेले धैर्यशीलभाऊ देशमुख यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आली आहे.

नातेपुते ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात नातेपुते गावातील देशमुख घराण्याला राजकीय व सामाजिक वारसा लाभलेले धैर्यशील भाऊ देशमुख यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात राष्ट्रवादीच्या घड्याळाला देशमुख यांच्या रूपाने चावी मिळून चालना मिळणार असल्याने घड्याळाची टिकटिक वाढणार आहे.
नातेपुते नगरीचे ज्येष्ठ नेते व माजी सरपंच श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन समाज भूषण स्वर्गीय मुधोजी राजे तथा नानासाहेब देशमुख यांनी घराण्याला आदर्श घालून दिलेला आहे त्याच आदर्शावर शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख. संजयकाका देशमुख, धैर्यशील देशमुख यांनी घराण्याचा वसा व वारसा जपलेला आहे बाबाराजे देशमुख यांनी नातेपुते ग्रामपंचायत सरपंच व सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषविलेले आहे संजय काका देशमुख यांनी नातेपुते ग्रामपंचायत सरपंचपद भूषविलेले आहे धैर्यशील भाऊ देशमुख यांनी नातेपुते ग्रामपंचायत उपसरपंच पद भूषविलेले आहे नातेपुते ग्रामपंचायत नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर मालोजी राजे उर्फ आबासाहेब देशमुख प्रथमच उपनगराध्यक्ष पद भूषवित आहेत देशमुख परिवार यांनी राजकारणाबरोबर विकास सेवा सोसायटी ,पतसंस्था, याचबरोबर शिक्षण क्षेत्रात व कृषी विभागात मोठी क्रांती केलेली आहे.


ह.भ.प. धैर्यशीलभाऊ देशमुख यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा नाम जप प्रकल्प सुरू करून शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा नाम जप प्रकल्प करणारे अनेक साधक भाऊंच्या विचाराचे आहेत धैर्यशील भाऊ यांनी ह भ प बंडातात्या कराडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन व्यसनमुक्त संघामध्ये काम करीत आहेत सध्या धैर्यशील भाऊ यांच्याकडे व्यसनमुक्त संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा व महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात धैर्यशीलभाऊ देशमुख यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा नाम जप प्रकल्प व व्यसनमुक्त संघाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष काम केलेले असल्याने धैर्यशील भाऊ यांच्या विचाराचे अनेक साधक आहेत. भाऊंची सामाजिक राजकीय व आध्यात्मिक कारकीर्द पाहता भाऊंनी समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेले असून त्यांना घराण्याचा राजकीय वारसा लाभलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून केंद्रीय माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे तळागाळात सर्वसामान्य जनतेपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व संसद पटू सुप्रियाताई सुळे यांचे विचार धारा पोहोचविण्याकरता सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी धैर्यशीलभाऊ देशमुख यांच्याकडे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे धैर्यशीलभाऊ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोचवून सामाजिक व राजकीय करून दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून संघटनेची बांधणी करतील असा आशावाद तळागाळातील कार्यकर्त्यांना वाटत आहे धैर्यशील भाऊ यांच्या निवडीने सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे विशेष म्हणजे माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला भाऊंच्या रुपाने चावी मिळाल्याने घड्याळाची टिकटिक वाढणार आहे असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button