माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार, डोंबाळवाडीचे जेष्ठ नेते महादेव केसकर यांची भाजपचे नूतन तालुका उपाध्यक्ष पदी निवड.
उद्योजक दत्तात्रय शेळके यांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पक्षाचे काम पश्चिम भागात जोरात सुरू
नातेपुते ( बारामती झटका )
भारतीय जनता पक्षाची माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली. यावेळी के. के. पाटील भाजपा जिल्हा सह प्रभारी, सोपान नारनवर जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब सरगर जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा, हनुमंतराव सूळ, बाळासाहेब वावरे, बी. वाय. राऊत, मुक्तार कोरबू, बाळासाहेब लवटे पाटील, संदीप पाटील, लक्ष्मण गोरड, तालुका संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दादासाहेब खरात, उद्योजक दत्तात्रय शेळके, लक्ष्मण माने, राहूल मदने, राजेंद्र वळकुंदे, उद्योजक सतीशतात्या ढेकळे, हनुमंत कर्चे, भैैय्यासाहेब चांगण, युवा नेते मनोज जाधव, सुनील बनकर, युवराज वाघमोडे, बलभीम जाधव, मिनीनाथ मगर, लाला साळवे आदींसह तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षपदी डोंबाळवाडी गावचे जेष्ठ नेते महादेव केसकर यांची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पै. सोमनाथ चव्हाण, लहु मोरे, मधुकर मोरे, अनिल मोरे, अमोल माने, अमोल मोरे, आत्माराम रूपनवर, नागेश सुळ, रवी महानवर, नाना बुवा धायगुडे, ऋषी वायसे, लक्ष्मण करे, विनोद वायसे आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम जोमाने केलेले होते. डोंबाळवाडीसह पश्चिम भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडलेले आहे. उद्योजक दत्तात्रय शेळके यांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पक्षाचे काम माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य व सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी के. के. पाटील, उद्योजक दत्तात्रय शेळके, तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे काम जोमाने करून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवत जनतेच्या हितासाठी काम करणार आहेत.
डोंबाळवाडी गावच्या सरपंचपदी पत्नी असताना पंचक्रोशीतील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले होते. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात सुपरिचित असणारे दिलदार व गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील असणारे महादेव केसकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेला असल्याने पक्षाला बळकटी मिळाली आहे तर राष्ट्रवादीला पश्चिम भागात खिंडार पडलेले आहे, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This article was a fantastic blend of information and entertainment. It really got me thinking. Let’s discuss further. Click on my nickname for more thought-provoking content!