Uncategorized

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात राजकीय भूकंप होणार, राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या संपर्कात…

माळशिरस (बारामती झटका)

भांब ता. माळशिरस या गावांमधील ज्येष्ठ नेते बबन रामा काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट दाजीराम काळे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल उर्फ पप्पू पांडुरंग काळे, मुंबई महानगर पालिका कॉन्ट्रॅक्टर पंढरीशेठ काळे यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांच्या संपर्कात असल्याने भांब गावात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला डोंगर कपारीमध्ये वसलेले भांब गाव आहे. या गावात संभाजी बाबा यांचे वास्तव्य होते. त्या ठिकाणी संभाजी बाबा यांचे समाधी मंदिर उभारलेले आहे. पंचक्रोशीमधील भाविक भक्त संभाजी बाबांच्या दर्शनाला येत असल्याने भांब गाव सर्व परिचित आहे. सदरच्या गावामध्ये राष्ट्रवादीच्या विचाराचे नेते व कार्यकर्ते आहेत. त्यामधीलच अनेक नेते व कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर असून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे नातू व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव भाजपचे विधान परिषदेचे युवा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या संपर्कात आहेत. लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याने भांब गावामध्ये राजकीय भूकंप होणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. Great read! The depth and clarity of your analysis are impressive. If anyone is interested in diving deeper into this subject, check out this link: DISCOVER MORE. Looking forward to everyone’s thoughts!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort